शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोल्हापुरातील खगोल प्रेमींनी अनुभवला पिंक सुपरमून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:31 IST

Supermoon : चैत्र पौर्णिमेला या वर्षातील पहिला विलोभनीय "पिंक सुपरमून" कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी मंगळवारी रात्री अनुभवला.

ठळक मुद्देकोल्हापुरातील खगोल प्रेमींनी अनुभवला पिंक सुपरमूनमे महिन्यातही संधी

कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेला या वर्षातील पहिला विलोभनीय "पिंक सुपरमून" कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी मंगळवारी रात्री अनुभवला.पौर्णमेचा चंद्र मंगळवारी सायंकाळी सात वाजून १५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर उगवला. नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा हा चंद्र आकाराने १० टक्के जादा आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसत होता. सुरुवातीला अवकाश काहीसे ढगाळ होते, त्यामुळे सायंकाळी ढगांच्या गर्दीत अत्यंत थोड्या काळासाठी चंद्र पाहता आला. परंतु त्यानंतर पहाटे पर्यंत चंद्राच्या विविध छटा खगोल प्रेमींनी अनुभवता आल्या.मंगळवारी भारतातील नागरिकांनी ह्या वर्षाचा पहिला गुलाबी चंद्र किंवा सुपरमून पाहिला. पृथ्वीचा सर्वात जवळ किंवा चंद्र त्याच्या परिघाच्या ९० टक्क्याचा आत असल्याने या नवीन वर्षातील पौर्णिमेचा हा ह्यसुपरमूनह्ण असे संबोधला गेला. हा चंद्र आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात तेजस्वी दिसला. पृथ्वी व चंद्र या मधील आजचे अंतर ३ लाख ५७ हजार किलोमीटर होते. ज्यांनी २६ आणि २७ एप्रिल रोजी या सुपर मूनचे दर्शन घेता आले नाही, त्यांना आज, दिनांक २८ रोजी सायंकाळी याचा अनुभव जरूर घेता येणार आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळून खगोल अभ्यासकानी आपापल्या घरी, मोकळ्या जागेत, टेरेसवर तसेच चंबुखडी परिसरात या चंद्र दर्शनाचा अनुभव घेतला. अवकाश संशोधन केंद्र,पन्हाळा आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर, सोळांकुर येथील प्रा. अविराज जत्राटकर, खगोल अभयक किरण गवळी, डॉ. राजेंद्र भस्मे, वैभव राऊत, यश आंबोळे, अभिषेक मिठारी इत्यादींसह अनेकांनी या सुपर पिंक मूनची निरीक्षणे केली.मे महिन्यातही संधीमे महिन्यात २५, २६ आणि २७ रोजी रात्री कोणत्याही वेळी उघड्या डोळ्यांनी पुढील सुपरमूनचे दर्शन एक महिन्यानंतर होणार आहे.पिंक सुपरमूनउत्तर अमेरिकेत वसंत ऋतू मध्ये रानटी फुले किंवा जो मॉस फॉल्क्स (फ्लोक्स सुबुलाटा) फुले फुलतात, ते गुलाबी रंगाची असतात आणि ती संपूर्ण जमीन आच्छादून टाकतात. ही चमकदार रंगाची फुले बहुतेकदा एप्रिलच्या पूर्ण चंद्राच्या वेळी फुलतात, म्हणून त्यास गुलाबी चंद्र असे म्हणतात. खगोल वैज्ञानिक रिचर्ड नोल यांनी १९७९ मध्ये सुपरमून या शब्दाची रचना केली. 

मंगळवारी दिसलेले सुपरमून अधिक तेजस्वी भासले. याशिवाय पुढील महिन्यात दिसणारे सुपर मुन आज रात्रीच्या दृश्यापेक्षा पृथ्वीच्या अगदी जवळ असेल.- डॉ. राजीव व्हटकर,समन्वयक, अवकाश संशोधन केंद्र,पन्हाळा आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

टॅग्स :environmentपर्यावरणSupermoonसुपरमूनkolhapurकोल्हापूर