शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘पिंकथॉन वूमन रन ’ उत्साहात, अडीशेहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 11:03 IST

अभिनेता व फिटनेस गुरू मिलिंद सोमण यांनी दोन वर्षांपूर्वी ‘पिंकथॉन गु्रप’ची स्थापना केली. हा गु्रप महिलांच्या आरोग्यासाठी देशभर कार्यरत आहे. त्याच्या वर्धापनदिनानिमित्त ‘पिंकथॉन कोल्हापूर चॅप्टर’तर्फे रविवारी सकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरात आयोजित केलेल्या ‘पिंकथॉन वुमेन रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात २५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत स्पर्धा पूर्ण केली.

ठळक मुद्देकोल्हापुरात ‘पिंकथॉन वूमन रन ’ उत्साहातअडीशेहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : अभिनेता व फिटनेस गुरू मिलिंद सोमण यांनी दोन वर्षांपूर्वी ‘पिंकथॉन गु्रप’ची स्थापना केली. हा गु्रप महिलांच्या आरोग्यासाठी देशभर कार्यरत आहे. त्याच्या वर्धापनदिनानिमित्त ‘पिंकथॉन कोल्हापूर चॅप्टर’तर्फे शिवाजी विद्यापीठ परिसरात आयोजित केलेल्या ‘पिंकथॉन वुमेन रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात २५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत स्पर्धा पूर्ण केली.या स्पर्धेेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते झाले. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने तंदुरुस्त असणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी योगा, पोहणे, धावणे या क्रीडाप्रकारांसह संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. याबाबत आयर्नमॅन मिलिंद सोमण, अजित पाठक, वैष्णवी नायक यांनी पिंकथॉन या नावाने महिलांसाठी गु्रप बनविला.

या गु्रपच्या वतीने संपूर्ण देशातील महिला वर्गासाठी धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. रविवारी सकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार दोन, तीन व पाच किलोमीटर अशा विविध टप्प्यांत ही स्पर्धा घेण्यात आली.

यात अडीचशेहून अधिक महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी मधुरिमाराजे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, विश्वविजय खानविलकर, सागर लालवाणी, केदार हसबनीस, सुरेश चेचर, दीपक पाटील, अक्षय नागवेकर, शीतल संघवी, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी आरती संघवी, गीता लालवाणी, सुमित्रा खानविलकर, वैशाली संघवी, मंजिरी हसबनीस, रूपाली नांगरे-पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनWomenमहिलाkolhapurकोल्हापूर