जिल्ह्यात २७ गावातील यात्रास्थळांना ‘क’ वर्गाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:22+5:302021-01-25T04:23:22+5:30
कोल्हापूर : एक लाखावर भाविक भेट देत असलेल्या जिल्ह्यातील २७ गावातील यात्रास्थळांना ‘क’ वर्गाचा दर्जा बहाल करण्यात आला ...

जिल्ह्यात २७ गावातील यात्रास्थळांना ‘क’ वर्गाचा दर्जा
कोल्हापूर : एक लाखावर भाविक भेट देत असलेल्या जिल्ह्यातील २७ गावातील यात्रास्थळांना ‘क’ वर्गाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. तेथील मंदिराच्या जीर्णोध्दार व सोई सुविधासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यात सर्वाधिक १६ गावे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. जिल्हा परिषदेने सादर केलेल्या यादीला शनिवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पन्हाळ्यातील बहिरेवाडी, दिगवडे, कोदवडे या तीन गावातील भैरवनाथ, गणेश मंदिर आणि स्वयंभू देवालय या यादीत आहेत.
शाहूवाडीतील १६ गावातील मंदिरे या यादीत आहेत. यात सावेतील महादेव मंदिर, हनुमान मंदिर, निनाईदेवी मंदिर, गणपती मंदिर. कसार्डेतील धोपेश्वर मंदिर, बुरंबाळमधील रत्नाईदेवी, निनाईदेवी मंदिर, चरणमधील चरणाई, नरसोबा व दत्त मंदिर. अणुस्कुरातील निनाईदेवी मंदिर. अमेणीतील जोतिर्लिंग मंदिर, कोपार्डेतील भैरोबा मंदिर. शिवारे येथील बाळूमामा मंदिर, पाटणेतील जुगाई मंदिर, शाहूवाडीतील अंबाबाई मंदिर, तुरुकवाडीतील मसोबा देवालय, परखंदळे येथील निनाई मंदिर, शिराळे तर्फ मलकापूर येथील काळेश्वर मंदिर, उखळूतील अंबाबाई नवलाई मंदिर, भेेडसगाव येथील निळकंटेश्वर मंदिर. नेर्ले येथील ज्योतिर्लिग मंदिर, साताळीदेवी मंदिर, शिरोळमधील हेरवाड येथील काडसिध्देश्वर मंदिर यांचा समावेश आहे.
हातकणंगलेतील मिणचे येथील हजरतपीर दर्गा, माणगाव येथील गणेश मंदिर. गगनबावड्यातील आणदूर येथील रासाईदेवी व मोरजाई देवी, महादेव मंदिर. करवीर तालुक्यातील धोंडेवाडी येथील हनुमान मंदिर, वसगडे येथील सम्राट अशोक बुध्द विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसर. कळंबे तर्फ ठाणे येथील कल्लेश्वर देवालय यांचा समावेश आहे.