शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Corona vaccine Kolhapur :शारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 18:58 IST

Corona vaccine Kolhapur : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून महाभकास आघाडी सरकारने कोल्हापूरवर केलेला अन्याय अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे सिद्ध होत आहे. राजकीय व शारीरिक वजन ज्यांना सारखेच वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असा टोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लगावला.

ठळक मुद्देशारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोलामागच्या दोन महिन्यांत लसीकरणात कोल्हापूर मागेच

कोल्हापूर : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून महाभकास आघाडी सरकारने कोल्हापूरवर केलेला अन्याय अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे सिद्ध होत आहे. राजकीय व शारीरिक वजन ज्यांना सारखेच वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असा टोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लगावला.भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई व अजित ठाणेकर यांनी लसीकरणावरून सुरू असलेल्या टीकेवरून दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देणारे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यात म्हटले आहे, लसीकरणाच्या विषयावर गंभीरपणे उत्तर देण्याऐवजी, पायावर पाय देण्याच्या भाषा म्हणजे उर्मटपणाच म्हणायला हवा. श्रावणबाळाची कावड वाहना-यांनी जरा मराठी वाड.मयाचाही नीट अभ्यास करावा आणि मगच पायावर पाय देण्याची भाषा करावी. आरोग्य राज्यमंत्री आजवर जिल्ह्यात झालेल्या लसीकरणामुळे जिल्हा राज्यात लसीकरण प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्षात हे लसीकरण एप्रिल व मे महिन्यात झालेले आहे. त्यामुळेच कोल्हापूरचे लसीकरणाची टक्केवारी वाढल्यासारखी वाटते, परंतु प्रत्यक्षात अन्य शहरातील लसीकरणाची संख्या पाहता मे व जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याला लसीचा अत्यल्प पुरवठा झाल्याचे स्पष्ट आहे.

त्यामुळे अन्य काही जिल्ह्यात व शहरात सुरू असलेले १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंद ठेवावे लागले आहे. २१ जूनला राज्यात ३ लाथ ८१ हजार लसीकरण झाले असताना त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात फक्त ३१८४ लसी दिल्या गेल्या. ही संख्या राज्यातील लसीकरणाच्या १ टक्काही नाही. २३ जूनला महाराष्ट्रातील विक्रमी ६,०२,००० लसीकरणामध्ये कोल्हापूर शहरात केवळ ४९८ लोकांचे लसीकरण झाले होते. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकार कोल्हापूरवर अन्याय करत आहे हेच खरे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBJPभाजपाkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या