फुलारी सांगलीचे नवे पोलीसप्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 01:23 IST2015-05-14T01:23:16+5:302015-05-14T01:23:31+5:30
अधिकाऱ्यांच्या बदल्या : दिलीप सावंत यांची मुंबईला बदली

फुलारी सांगलीचे नवे पोलीसप्रमुख
सांगली : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांची मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली असून, बदलीचे आदेश बुधवारी सायंकाळी आले. त्यांच्या जागी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्राचार्य सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप सावंत यांनी जून २०१२ मध्ये सांगलीचे पोलीसप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकालात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शांततेत व सुरळीत झाल्या. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरुद्धची कारवाई, रस्ता सुरक्षा मोहीम, वाहतुकीला शिस्त, खासगी सावकारी याबाबत त्यांनी जोरदार मोहीम उघडली. जिल्ह्यात सर्वाधिक नाकाबंदी, ‘को5ैम्बिंग आॅपरेशन’ मोहीम राबविण्याची नोंद सावंत (पान १० वर) यांच्या कारकीर्दीत झाली. त्यांनी जिल्ह्णातील सराईत गुन्हेगार असणाऱ्या सात टोळ्यांवर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करून ५६ गुंडांना गजाआड केले. त्यांच्या मोक्का कारवाईला घाबरून अनेक गुन्हेगारांनी पलायन केले आहे. पोलीस-नागरिक समन्वय बैठक, पोलिसांची आरोग्य तपासणी, पोलीस आपले मित्र, पोलीस कल्याणाचे कार्यक्रम आदी मोहिमाही त्यांनी चांगल्याप्रकारे राबविल्या. वर्षापूर्वी त्यांना भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) दर्जा मिळाला.
दिलीप सावंत यांच्या जागी नाशिकहून महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्राचार्य सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते सोमवारी १८ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सांगली जिल्ह्यात काम करताना वेगळा आनंद मिळाला. बदली होऊन जाताना चांगल्या कामाचे समाधान वाटत आहे. गेल्या दोन, तीन महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत होतो. येथील नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले. गुन्हेगारीवर नियंत्रण आणले. सहकारी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.
- दिलीप सावंत, मावळते पोलीस अधीक्षक, सांगली.