करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल
By Admin | Updated: July 12, 2017 16:51 IST2017-07-12T16:51:04+5:302017-07-12T16:51:04+5:30
- गुन्हा नोंद करण्याची भ्रष्टाचारविरोधी कृती समितीची मागणी

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर , दि.१0 : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेचा बाऊ केला जात असताना काही दिवसांपूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यातील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. अशाप्रकारे नियमबा" छायाचित्रे काढणाऱ्या व्यक्तीविरोधात तसेच घागरा-चोलीसंदर्भात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल देवस्थान समितीवरही गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी बुधवारी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने केली आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाई मंदिर एटीएसअंतर्गत ‘हाय अलर्ट’वर असताना गाभाऱ्यातील खोल्यांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे २५ जूनला व्हॉटस् अॅपवर व्हायरल झाली आहेत. हा प्रकार म्हणजे सुरक्षेच्या नियमांचा भंग आहे. सदरची व्यक्ती कोण होती, त्याने रितसर प्रशासकीय परवानगी घेतली होती का, असे नियमबा" छायाचित्रे कुणाला पुरवली आहेत का, त्यामागे काही षङ्यंत्र आहे का यासंबंधीची चौकशी व्हावी व गुन्हा दाखल करण्यात यावा. अंबाबाईला घागरा-चोली नेसवता येणार नाही, असे देवस्थान समितीने सांगूनही पुजाऱ्याने देवीची त्या रूपात पूजा बांधली. त्यावर समितीने तातडीने पुजाऱ्याला पूजा बदलण्यास सांगणे किंवा कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, असे न करता दहा दिवसांनंतर समितीने नोटीस काढली. त्यामुळे शासकीय जबाबदारी पार पाडण्यास अक्षम असणाऱ्या देवस्थान समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात यावा.
यावेळी महेश उरसाल, प्रमोद सावंत, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, महादेव कुकडे, बंडा साळोखे, सुधाकर सुतार, राजू पाटील, शिवाजी ससे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.