उघड्यावर शौचास बसणाऱ्याचे झळकते छायाचित्र

By Admin | Updated: November 30, 2015 01:15 IST2015-11-29T21:20:34+5:302015-11-30T01:15:48+5:30

कुरुंदवाड नगरपालिका : गांधीगिरी कारवाईची नागरिकांतून धास्ती

Photograph of the star sitting on the open | उघड्यावर शौचास बसणाऱ्याचे झळकते छायाचित्र

उघड्यावर शौचास बसणाऱ्याचे झळकते छायाचित्र

कुरुंदवाड : येथील नगरपालिका प्रशासनाने शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. वैयक्तिक शौचालय अनुदानाबरोबर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालय असतानाही अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने पालिकेने नामी शक्कल लढविली आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र काढून शहरातील प्रमुख चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गुडमॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली असून, पथकाच्या या गांधीगिरी कारवाईची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
पालिकेने ३१ डिसेंबरअखेर शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात सुमारे ३०० सार्वजनिक शौचालये आहेत. कुटुंब संख्येनुसार सर्व्हे करून वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्या कुटुंबीयांना १७ हजारांचे अनुदानही देण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही शहरातील काही भागांत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पथक पहाटे विविध भागांत फिरून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे व्हिडिओ शूटिंग व छायाचित्र
काढण्यात येते. या व्यक्तींची छायाचित्रे शहरातील प्रमुख चौकात मोठा डिजिटल फलक उभारून त्यावर लावण्यात येत आहेत. सन्मित्र चौक, थिएटर चौक, पालिका चौक व दर्गा चौकात पालिकेने मोठे डिजिटल फलक उभारले आहेत.
या अभिनव व गांधीगिरी कारवाईची शहरवासीयांनी चांगलीच धास्ती घेतली असून, उघड्यावर शौचास बसणारे सार्वजनिक शौचालयांचा आधार घेत आहेत. (वार्ताहर)


शनिवारी पहाटे गुडमॉर्निंग पथकाला शौचालयास बसलेले सातजण आढळले. या पथकाने त्यांची छायाचित्रे काढून ठिकठिकाणी चौकात उभारलेल्या डिजिटल फलकांवर लावण्यात आली. ते पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली होती. मात्र, छायाचित्र असलेल्या नागरिकांनी रातोरात फलकांवरील छायाचित्रे काढून टाकली आहेत. त्यामुळे या कारवाईची भीती नागरिकांतून चर्चिली जात आहे.

Web Title: Photograph of the star sitting on the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.