फोटो फिचर: आदित्य वेल्हाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST2021-09-17T04:28:43+5:302021-09-17T04:28:43+5:30
१६०९२०२१-कोल-मसाई पठार ०१ फोटो ओळ: कोल्हापूर शहरापासून अवघ्या २५ किलोमीटरच्या अंतरावर असलेले मसाई पठार अल्पजिवी वनस्पतींच्या रंगीबेरंगी फुलांनी बहरुन ...

फोटो फिचर: आदित्य वेल्हाळ
१६०९२०२१-कोल-मसाई पठार ०१
फोटो ओळ: कोल्हापूर शहरापासून अवघ्या २५ किलोमीटरच्या अंतरावर असलेले मसाई पठार अल्पजिवी वनस्पतींच्या रंगीबेरंगी फुलांनी बहरुन गेले आहे. हे पुष्पवैभव पाहून सातारच्या कास पठारची अनुभूती येते. कुर्डूच्या वनस्पतीने पठाराला गुलाबी छटा आली आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)
१६०९२०२१-कोल-मसाई पठार ०२
फोटो ओळ: या पठारावर बहरलेली गेंद फुले पाहून जणू पांढरे शुभ्र झुबकेच ठेवले आहेत, असे दिसत आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)
१६०९२०२१-कोल-मसाई पठार ०३
फोटो ओळ: स्मिथिया अर्थात नाल नावाची ही फुले आकर्षण ठरले आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)
१६०९२०२१-कोल-मसाई पठार ०३
फोटो ओळ: सोनकी नावाचे हे फुल जणू चित्रात काढल्यासारखे आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)
१६०९२०२१-कोल-मसाई पठार ०४
फोटो ओळ: सायनोटीस नावाचे हे फुल तर एकदमच बारीक. दिसायला जरी सुक्ष्म असले तरी त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)
१६०९२०२१-कोल-मसाई पठार ०५
फोटो ओळ: रानजवस नावाचे फुल तर आणखीच वेगळे. रंग व नाजूकपणा काय असतो ते याकडे पाहून दिसते. (छाया: आदित्य वेल्हाळ)
१६०९२०२१-कोल-मसाई पठार ०६
फोटो ओळ: सीतेची आसवं या नावाने असलेले फुल दिसायला एकदम आकर्षक पण हे कीटकभक्षी फूल आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)