शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

राज्य नाट्यमध्ये फिनिक्सचा ह्येच्या आईचा वग प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 15:10 IST

५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर या केंद्रातून फिनिक्स क्रिएशन्सच्या ‘ह्येच्या आईचा वग’ या नाटकाने प्रथम पारितोषिकमिळविले. संस्थेला सलग पाच वर्षे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र ‘नर्व्हस थ्रीचा रेकॉर्ड ब्रेक’ यांनी प्रथम स्थान पटकाविले. इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेच्या ‘हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ’ या नाटकाला दुसरा क्रमांक मिळाला असून, या दोन्ही संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्दे राज्य नाट्यमध्ये फिनिक्सचा ह्येच्या आईचा वग प्रथमहुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ द्वितीय

कोल्हापूर : ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर या केंद्रातून फिनिक्स क्रिएशन्सच्या ‘ह्येच्या आईचा वग’ या नाटकाने प्रथम पारितोषिकमिळविले. संस्थेला सलग पाच वर्षे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र ‘नर्व्हस थ्रीचा रेकॉर्ड ब्रेक’ यांनी प्रथम स्थान पटकाविले. इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेच्या ‘हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ’ या नाटकाला दुसरा क्रमांक मिळाला असून, या दोन्ही संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.रुद्राक्ष अकॅडमी, कोल्हापूर या संस्थेच्या ‘मोठ्यांचा शेक्सपियर’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. अन्य विभागांतील निकाल पुढीलप्रमाणे-दिग्दर्शन (अनुक्रमे प्रथम, द्वितीय) संजय मोहिते (नाटक- ह्येच्या आईचा वग), निरुद्ध दांडेकर (नाटक- हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ), प्रकाश योजना : विनायक रानभरे (हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ), तेजस कोळी (मोठ्यांचा शेक्सपिअर), नेपथ्य : अमोल नाईक (ह्येच्या आईचा वग), प्रवीण लायकर (हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ), रंगभूषा : ओंकार पाटील (तुघलक), सुनीता वर्मा (युद्ध नको मज बुद्ध हवा).उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : सचिन वाडकर (ह्येचा आईचा वग) व कादंबरी माळी हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे तेजस्विनी सोनसाळे (वृंदावन), प्रतीक्षा गवस (पुरूष), वैदेही सावंत (नटरंग), पूर्वा कोडोलीकर (ऐश्वर्या ब्युटी पार्लर), उज्ज्वला खांडेकर शहा (ऊन-पाऊस), परसु गावडे (विच्छा माझी पुरी करा), युवराज केळूसकर (तुघलक), निहाल रोकडीकर (मोठ्यांचा शेक्सपिअर), रोहित पोतनीस (अंदाधुंद), सतीश तांदळे (देव हरवला)संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात १५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत एकूण २८ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून प्रा. मधु जाधव, मुकुंद हिंगणे, गौरी लोंढे यांनी काम पाहिले.

आजचा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असा आहे. पाच वर्षे आम्ही राज्य नाट्यमध्ये तिसºया क्रमांकावर होतो; त्यामुळे अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. यावेळी नव्या दमाची मुलं घेऊन नाटक बसवलं. अभिनय, नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंग-वेशभूषा या सगळ्या पातळ्यांवर त्यांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका निभावली. आम्ही केलेल्या टीम वर्कचे हे फलित आहे.संजय मोहिते (दिग्दर्शक)

 

 

टॅग्स :Natakनाटकkolhapurकोल्हापूर