सामाजिक सलोख्याचे दर्शन

By Admin | Updated: July 17, 2014 00:17 IST2014-07-17T00:00:12+5:302014-07-17T00:17:12+5:30

नंगीवली दर्गा : ऐतिहासिक महत्त्व; सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान

The philosophy of social harmony | सामाजिक सलोख्याचे दर्शन

सामाजिक सलोख्याचे दर्शन

एम. ए. पठाण - कोल्हापूर
नंगीवली दर्गा हा सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आहे. येथील मस्जिद परिसरात रमजान महिन्यातील तरावीह, नमाज पठण, रोजा इफ्तार, आदी धार्मिक विधी सुरू आहेत. यामुळे मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांची रेलचेल पहावयास मिळते. परिसरात हिंदू-मुस्लिम बांधव बंधूप्रेमाने राहत असून येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडते.
हजरत पीर नंगेशहावली रहमुतुल्लाहिअलैही (वलीबाबा) यांची दर्गा ही पेशवेकालीन आहे. या परिसरात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना दर्गा परिसरात नमाजची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैगंबरवासी बादशहाजी बारगीर यांनी दर्गा परिसरात छोटी मस्जिद उभारली. दगडी बांधकाम असलेली ही आकर्षक छोटी मस्जिद आहे. यामध्ये सर्वसाधारण ३० मुस्लिम बांधव नमाज पठण करू शकतात. सध्या ही मस्जिद येथील मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी अपूर्ण पडत आहे. यामुळे दर्गाच्या पाठीमागे व बाजूने शेड मारण्यात आले आहे. येथे मुस्लिम बांधवांची नमाज पठणाची व्यवस्था झाली आहे.
रमजान महिन्यात येथे तरावीह, नमाज पठण होत आहे. रोजा इफ्तारसाठी मस्जिद परिसरात व्यवस्था केली जाते. त्यामध्ये मुस्लिम बांधव सहभागी होतात. काही येथे गैरसोयी आहेत. या परिसराची व्यवस्था नंगीवली दर्गाह आणि मस्जिद ट्रस्टतर्फे होत आहे. यामध्ये मुराद बारगीर, अहमद सदलगे व अन्य ट्रस्टी चांगल्याप्रकारे कामकाज पाहतात.

Web Title: The philosophy of social harmony