पीएच.डी. संशोधकांना मिळणार शिष्यवृत्ती

By Admin | Updated: November 26, 2014 00:44 IST2014-11-26T00:36:01+5:302014-11-26T00:44:57+5:30

विद्यापीठात महिला वसतिगृहाला मान्यता

Ph.D. Researchers will get scholarships | पीएच.डी. संशोधकांना मिळणार शिष्यवृत्ती

पीएच.डी. संशोधकांना मिळणार शिष्यवृत्ती

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमधील पीएच.डी.च्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी संशोधन शिष्यवृत्ती मिळणार आहे शिवाय महिला वसतिगृह बांधण्यास विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने आज, मंगळवारी मान्यता दिली.
विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. प्र-कुलगुरूपदी डॉ. अशोक भोईटे, सचिवपदी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे होते. देशातंर्गत परिषदा, चर्चासत्रे, संमेलने, अधिवशन, कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिर आदींना उपस्थित राहिलेल्या विद्यापीठ अधिविभागांतील आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत नेमलेल्या उपसमितीचा अहवालमान्य परिषदेने मान्य केला.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेखाली विद्यापीठाला मिळालेल्या अर्थसहाय्यातून महिला वसतिगृह बांधण्यास मान्यता दिली तसेच इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि संगणकशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाय कृषी रसायने व कीड व्यवस्थान अधिविभागातर्फे जानेवारी २०१५ मध्ये घेण्यात येणाऱ्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस आणि शिक्षणशास्त्र अधिविभागामार्फत सहा दिवसीय ‘फॅक्टली डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यासह वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातील एमबीए युनिटमार्फत फेब्रुवारी २०१५ मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यास परिषदेने मान्यता दिली. (प्रतिनिधी)


मास कम्युनिकेशनच्या माहितीपटाचे सादरीकरण
मास कम्युनिकेशन विभागाने तयार केलेल्या विद्यापीठाच्या माहितीपटाचे बैठकीच्या प्रारंभी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेला माहितीपट पाहून व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Ph.D. Researchers will get scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.