‘शिवराज फार्मसी’मध्ये औषधनिर्माणशास्त्र दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:54+5:302021-09-26T04:25:54+5:30
येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषधनिर्माणशास्त्र दिन उत्साहात पार पडला. यानिमित्त औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. प्रांताधिकारी बाबासाहेब ...

‘शिवराज फार्मसी’मध्ये औषधनिर्माणशास्त्र दिन उत्साहात
येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषधनिर्माणशास्त्र दिन उत्साहात पार पडला. यानिमित्त औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिवराज फार्मसी कॉलेज आणि जानकी फार्मा एजन्सी, ऋतुजा मेडिकल व चिंतामणी मेडिकल्स यांच्यात सामंजस्य करार झाला.
प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, ॲड. दिग्विजय कुराडे, संदीप मिसाळ, नितीन पेडणेकर, विजय शिवबुगडे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास संजय मोहिते, राजगोंडा पाटील, देवाप्पा तुप्पुरवाडकर आदी उपस्थित होते. प्राचार्य संतोष कुरबेट्टी यांनी प्रास्ताविक केले. वर्षा शेवाळे यांनी सूत्रसंचलन केले. प्रणव सावेकर यांनी आभार मानले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यावेळी अनिल कुराडे, एस. एम. कदम, संतोष कुरबेट्टी, दिग्विजय कुराडे उपस्थित होते.
क्रमांक : २५०९२०२१-गड-०४