स्वॅब न दिलेल्या व्यक्तीचा अहवाल आला कोरोना पॉझीटिव्ह; गोंधळ चव्हाट्यावर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 08:19 PM2021-08-10T20:19:44+5:302021-08-10T20:19:54+5:30

आरोग्य विभागाच्या यंत्रणेतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर 

The person who did not swab was reported to be corona positive in | स्वॅब न दिलेल्या व्यक्तीचा अहवाल आला कोरोना पॉझीटिव्ह; गोंधळ चव्हाट्यावर  

स्वॅब न दिलेल्या व्यक्तीचा अहवाल आला कोरोना पॉझीटिव्ह; गोंधळ चव्हाट्यावर  

googlenewsNext

- अनिल पाटील 

सरूड:  कोरोना चाचणीसाठी स्वॅब न  दिलेल्या सरुड ( ता . शाहूवाडी ) येथील एका ४४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल चक्क  पॉझिटिव्ह दाखविण्यात आल्याने स्वॅब तपासणीमधील आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा सावळा गोंधळ  चव्हाट्यावर आला आहे. याबाबत अधिक माहीती  अशी,  सरुड येथे मॅसीव्ह स्वॅब ड्राईव्ह या मोहीमेअंतर्गत  संबधीत व्यक्तीच्या घरामध्ये स्वॅब घेण्यासाठी गेलेल्या पथकाने त्या व्यक्तीच्या पत्नीचा स्वॅब आर .टी . पी . सी . आर . तपासणीसाठी घेतला. त्यानंतर त्यांनी घरात उपस्थित नसलेले तिचा पती व सासू सासरे अशा तीन व्यक्तींचे मोबाईल नंबर घेतले . या मोहीमेतंर्गत घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्वॅब दिलेल्या त्या महिलेसह स्वॅब न दिलेल्या तिच्या पती व  सासू , सासऱ्याच्यांही अहवालाचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला.

यामध्ये  संबधीत महिलेच्या  पतीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटिव्ह तर तिच्या सासू सासऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह दाखविण्यात आला आहे. संबधीत माहिलेचा अहवालही निगेटिव्ह आला आहे . जर  स्वॅबच तपासणीसाठी दिलेला नाही तर स्वॅब न दिलेल्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटिव्ह कसा आला? असा सवाल नागरिकांच्याकडुन उपस्थित केला  जात आहे . या प्रकाराने कोरोना काळातील आरोग्य यंत्रणेतील सावळा गोंधळ  चव्हाट्यावर आला असुन आरोग्य यंत्रणेच्या स्वॅब चाचण्यांवर व नागरिकांचे येत असलेल्या स्वॅब तपासणीच्या अहवालाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: The person who did not swab was reported to be corona positive in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.