जिद्द, चिकाटी, मेहनत ही यशाची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:36+5:302021-09-09T04:29:36+5:30

धामोड : जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर ...

Perseverance, perseverance, hard work are the three pillars of success | जिद्द, चिकाटी, मेहनत ही यशाची त्रिसूत्री

जिद्द, चिकाटी, मेहनत ही यशाची त्रिसूत्री

धामोड : जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात; पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते, असे उद्गार राधानगरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी काढले.

कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या गुणवंतांचा सत्कार व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन संजयसिंह पाटील हे होते.

यावेळी दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या अनुक्रमे अंजली सनगर, अनुराधा पाटील, दीशा पाटील, हर्षद विटेकर, सानिका बावडेकर, समृद्धी पाटील यांचा, तर एनएमएमएसमध्ये शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या सानिका शेलार, तनुजा पाटील, रसिका सनगर, नेहा तेली, समर्थ परीट, शमीन शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शिक्षक दिनी सेवानिवृत्त झालेले शाळेचे सहायक शिक्षक के. एल, बोरनाक व एस. एस. कुकडे यांचा सपत्नीक सत्कार केला.

080921\1924-img-20210908-wa0063.jpg

फोटो ओळी - तारळे (ता राधानगरी ) येथील श्री शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंतांच्या सत्कार समारंभात बोलताना गटशिक्षणाधिकारी बी .एम .कासार, शेजारी भोगावतीचे संचालक संजयसिंह पाटील, शिवाजीराव पाटील, रवींद्र पाटील आदी

छाया -श्रीकांत ऱ्हायकर

Web Title: Perseverance, perseverance, hard work are the three pillars of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.