बेळगावात महामेळाव्याला परवानगी

By Admin | Updated: December 9, 2014 00:58 IST2014-12-09T00:48:45+5:302014-12-09T00:58:38+5:30

आजपासून अधिवेशन : म. ए. समिती अधिवेशनाला विरोध करणार

Permission to hinge in Belgaum | बेळगावात महामेळाव्याला परवानगी

बेळगावात महामेळाव्याला परवानगी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या, मंगळवारी आयोजित केलेल्या महामेळाव्याला अखेर पोलीस खात्याकडून परवानगी मिळाली आहे. कर्नाटक सरकार बेळगाववरील आपला हक्क सांगण्यासाठी हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये घेत असून, त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. व्याक्सीन डेपो मैदानावर उद्या सकाळी दहा वाजता महामेळावा होणार असून, सोमवारी सकाळपासून शामियाना उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. आमदार संभाजी पाटील यांच्या हस्ते शामियान्याची मुहूर्तमेढ उभारून कामाला प्रारंभ करण्यात आला .
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गावोगावी जाऊन महामेळाव्यासंबंधी जनजागृती करण्यात आली आहे. पोलीस खात्याकडून परवानगी मिळाली नाही तरी महामेळावा घेण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला होता. शहर पोलीस आयुक्तांनी महामेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. परवानगी देताना पोलीस खात्यातर्फे संयोजकांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. महामेळाव्यात काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी संयोजकांवर असेल. कर्नाटक सरकार विरोधात कोणतेही वक्तव्य करू नये आदी अटी पोलीस खात्याने घातल्या आहेत. महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने सीमावासीयांनी महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Permission to hinge in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.