पट्टणकोडोलीत कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST2021-05-10T04:22:57+5:302021-05-10T04:22:57+5:30
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामविकास अधिकारी आर. ए. सिदनाळे हे सतत गैरहजर राहतात. तसेच सदस्यांना विश्वासात न ...

पट्टणकोडोलीत कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी नेमा
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामविकास अधिकारी आर. ए. सिदनाळे हे सतत गैरहजर राहतात. तसेच सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीतपणे चालत नाही. त्यामुळे सिदनाळे यांची येथील नियुक्ती रद्द करून गावासाठी कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी निवेदनाद्वारे सरपंच, उपसरपंच आणि तेरा सदस्यांनी हातकणंगलेच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पट्टणकोडोली हे गाव ३५ हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. याठिकाणी ग्रामस्थांच्या समस्या आणि अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत. येथील ग्रामविकास अधिकारी आर. ए. सिदनाळे हे नियमित हजर नसतात. सभागृहाला विश्वासात न घेता, मनमानी कारभार करतात. त्यामुळे गावाचा कारभार चालवताना अडचणी निर्माण होतात. याबाबत ग्रामस्थांनी नेहमीच ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे पट्टणकोडोलीचा मनमानी कारभार करणारे ग्रामविकास अधिकारी सिदनाळे यांची नियुक्ती रद्द करून कायमस्वरुपी हजर राहणारा ग्रामविकास अधिकारी गावासाठी देऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थांची अडचण दूर करावी, अशी मागणी सरपंच विजया जाधव, उपसरपंच अंबर बनगे आणि तेरा सदस्यांनी हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.