‘पर्ल्स’च्या एजंटाची विहिरीत आत्महत्या
By Admin | Updated: November 12, 2014 00:40 IST2014-11-12T00:35:02+5:302014-11-12T00:40:49+5:30
आगरमधील घटना : गुंतवणूकदारांच्या तगाद्याने कृत्य

‘पर्ल्स’च्या एजंटाची विहिरीत आत्महत्या
शिरोळ : पर्ल्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावल्याने मौजे आगर (ता. शिरोळ) येथील एजंटाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. चंद्रकांत आप्पासाहेब पाटील (वय ३६, रा. हनुमाननगर, मारुती माळ, मौजे आगर) असे त्याने नाव आहे. सोलापूरपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातही पर्ल्सच्या एजंटाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चंद्रकांत पाटील याने जून २०११ साली पर्ल्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा एजंट कोड काढला होता. सांगली शाखेअंतर्गत तो काम करीत होता. जयसिंगपूर, शिरोळ, तारदाळ, आगर भागातील गुंतवणूकदारांकडून पर्ल्समध्ये त्याने पैसे गुंतविले होते. दरम्यान, कंपनीच्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांची मुदत संपूनही पैसे न मिळाल्याने त्यांनी पाटील यांच्याकडे पैशासाठी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून तगादा लावला होता, अशी माहिती पुढे आली आहे. पर्ल्स कंपनीमध्ये चंद्रकांतच्या वडिलांनीही (पान ४ वर)
शिरोळ तालुक्यात
एक हजार एजंट ?
राज्यातील पर्ल्स कंपनीच्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांनी आता एजंटाकडे मोठा तगादा लावला आहे. शिरोळ तालुक्यात एक हजारांहून अधिक एजंट आहेत.
कंपनीत गुंतविलेल्या पैशांची मुदत पूर्ण होऊनही पैसे न मिळाल्याने एजंटांकडे पाठपुरावा सुरू झाला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक तालुक्यातून झाल्याचे समजते.