शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी भाजपच्या 'अब की बार ४०० पार' घोषणेची हवाच काढली, म्हणाले..

By पोपट केशव पवार | Updated: January 18, 2024 18:24 IST

गढूळ वातावरणात 'सत्यशोधक' दिशादर्शक

कोल्हापूर : भाजपचा आत्मविश्वास गेला आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे तर पक्ष फोडण्याची वेळ का येते ? असा सवाल करत येणारी लोकसभा निवडणूक भाजप विरुध्द जनता अशी होणार असल्याने भाजप ४०० की २०० जागा पार करणार हे जनताच ठरवेल, या शब्दांत काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपच्या 'अब की बार ४०० पार' या घोषणेची हवाच काढून घेतली.कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एकत्रित सत्यशोधक चित्रपट पाहिला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आ. सतेज पाटील म्हणाले, भाजपची प्रतिमा चांगली आहे तर नऊ वर्षे केलेल्या कामांवरच त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. मात्र, त्यांचा आत्मविश्वास गेल्यानेच ते पक्ष फोडाफोडी करत आहेत.भाजपकडून शिंदे कुटुंबाला टार्गेटमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपने दिलेल्या ऑफरवर पाटील म्हणाले, शिंदे कुटुंबीय गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसची एकनिष्ठ आहे. या ऑफरवर सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, भाजपकडून त्यांना टार्गेट केले जात आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस एकसंघ आहे आणि ती पुढेही एकसंघ राहील.राजू शेट्टी सोबत हवेतस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना सोबत घ्या अशा सूचना वारंवार वरिष्ठांना केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला. शेट्टी यांच्याशी बोलणे होत असून त्यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गढूळ वातावरणात 'सत्यशोधक' दिशादर्शक सत्यशोधक चित्रपट सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात समाजाला दिशादर्शक ठरेल. एका बाजूला द काश्मीर फाइल्ससारखा प्रपोगंडा चित्रपट काढून मतांचा ध्रुवीकरण केले जाते. कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हा प्रयत्न झाला होता, मात्र कोल्हापूरकरांनी हा प्रयत्न हाणून पाडल्याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपा