जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST2020-12-05T05:02:21+5:302020-12-05T05:02:21+5:30

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीत राज्यभरातील जनतेने महाविकास आघाडीच्या सरकारवर विश्वास दाखवल्यानेच आम्हांला चांगले यश मिळू शकले, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे ...

People showed faith in Mahavikas Aghadi: Satej Patil | जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला : सतेज पाटील

जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला : सतेज पाटील

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीत राज्यभरातील जनतेने महाविकास आघाडीच्या सरकारवर विश्वास दाखवल्यानेच आम्हांला चांगले यश मिळू शकले, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सतेज पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध मुख्यत: तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वाढती बेरोजगारी, आर्थिक नाकेबंदी अशा कारणांनी तो त्रस्त झाला आहे. त्याने आपला राग मतपेटीतून व्यक्त केला आहे. भाजप राज्यात सुशांतसिंह आत्महत्या, कंगना राणावत प्रकरण अशा जनतेच्या जगण्या-मरण्याशी संबंधित नसलेल्या विषयांवर चर्चा-आंदोलने करीत राहिली. त्यांना लोकांमध्ये काय असंतोष आहे याचे भान आले नाही. कॉँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केले. त्यामुळेच हे यश आम्ही खेचून आणू शकलो.

Web Title: People showed faith in Mahavikas Aghadi: Satej Patil