कागलमधील जनतेने धाडसी निर्णय घ्यावा

By Admin | Updated: January 22, 2017 00:36 IST2017-01-22T00:36:52+5:302017-01-22T00:36:52+5:30

समरजितसिंह घाटगे : एक संधी द्या; विकास काय असतो ते दाखवितो

People in Kagal must take bold decisions | कागलमधील जनतेने धाडसी निर्णय घ्यावा

कागलमधील जनतेने धाडसी निर्णय घ्यावा

सेनापती कापशी : राजकारणातून कोणाला तरी संपविण्यासाठी नव्हे, तर राजे गटाला मोठे करण्यासाठी मी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या रूपाने मी कागल तालुक्यातील जनतेला सक्षम पर्याय देत आहे. या निवडणुकीत माझ्या घरचा कोणीही उमेदवार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देणार असल्यामुळे जनतेने धाडसी निर्णय घ्यावा. फक्त मला एकदा संधी द्यावी; विकास काय असतो ते मी तालुक्यातील जनतेला दाखवितो, असे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे यांनी केले.
ते सेनापती कापशी (ता. कागल) येथे वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ व चिकोत्रा खोऱ्यातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती उदयसिंह घोरपडे होते.
घाटगे म्हणाले, येत्या पाच ते सहा दिवसांत तालुक्यातील सर्व १५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असून, गेली ३० ते ३५ वर्षे राजकारण करणाऱ्यांनी विकासाचे मुद्दे मांडावेत. जनतेनेही ठोस विकास आणि मुद्द्यावरच मते टाकावीत. चिकोत्रा खोऱ्यात आता ‘कमळ’ फुलविल्याशिवाय थांबायचे नाही.
उदयसिंह घोरपडे म्हणाले, राजे गट हा तात्त्विक विचारधारा जोपासणारा गट आहे. ही विचारांची लढाई आहे. समरजित घाटगेंचे नेतृत्व व्यापक असून, त्यांनी कागल तालुक्याचे नेतृत्व करावे.
यावेळी उमेश देसाई, राजाभाऊ माळी, संजय बरकाळे, बाळासो काटकर (चिखली), शुभांगी काटकर (चिखली), अनिल भोसले (चिखली), सुरेश मांगोरे, संतोष शेळके (जैन्याळ), आदींनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
राजाभाऊ माळी, सुजाताताई देसाई, संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, तर शिबिराज शिवूडकर यांनी आभार मानले. वाढदिवसानिमित्त समरजित घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. आनंदा मांगले, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बॉबी माने, संदीप पाटील, केरुआबा कांबळे, राजेंद्र सरनाईक, तानाजी कुरणे उपस्थित होते. (वार्ताहर)


पाणी समस्या सोडविण्यासाठीच भाजपमध्ये : देसाई
चिकोत्रा खोऱ्याची भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. चारही बाजूने डोंगर आहे. येथे पाऊसही मुबलक पडतो; पण गेली ३0 ते ३५ वर्षे राजकारण करणाऱ्या नेत्यांना पाण्याचे नियोजन का जमले नाही. चिकोत्रा खोऱ्याची पाणी समस्या मोठी आहे. समरजितसिंह घाटगेंनी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा व विकासाचे राजकारण तालुक्यात सुरू केले. यामुळेच आम्ही कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे उमेश देसाई यावेळी म्हणाले.


सेनापती कापाशी (ता. कागल) येथे चिकोत्रा खोऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशप्रसंगी आयोजित कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमरसिंह घोरपडे, उदयबाबा घोरपडे, राजाभाऊ माळी, उमेश देसाई, केरुआबा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: People in Kagal must take bold decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.