दिव्यांगांना सहानुभूती नको, सहकार्य हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:34+5:302020-12-05T04:53:34+5:30
शिवाजी विद्यापीठाचे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र, युजीसी स्किम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज् आणि सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास ...

दिव्यांगांना सहानुभूती नको, सहकार्य हवे
शिवाजी विद्यापीठाचे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र, युजीसी स्किम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज् आणि सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता प्राचार्य डॉ. मेघा गुळवणी होत्या. दिव्यांगांना त्यांच्या अपंगत्वावर कशी मात करता येईल, याचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारचे काम करणाऱ्या संस्थांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी सांगितले. समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या समन्वयक डॉ. नमिता खोत यांनी प्रास्ताविक केले. कल्याणी साठे यांनी सूत्रसंचालन केले. युजीसी स्किम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीजच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.