शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य व केंद्रातील भ्रष्ट जुमला सरकारमुळे जनता मेटाकुटीला, रोहिणी खडसे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:05 IST

समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार

कोल्हापूर : राज्य व केंद्रातील भ्रष्ट जुमला सरकारमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. महागाईने टोक गाठले असताना हे सरकार भावनिक वातावरण करून दिशाभूल करत आहे. महागाईची झळ आपणा सर्वांना सहन करावी लागत असून, आता थांबायचे नाही, दुर्गेचे रूप घेऊन जुमला सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा मेळावा मंगळवारी झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील होते.राेहिणी खडसे म्हणाल्या, या वयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा संघर्ष सुरू आहे. पक्षातून काही लोक बाजूला गेले असले तरी पुन्हा नेटाने उभे राहण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी लावली आहे. तुम्हीही भाजप सरकारविरोधात गावागावांत जाऊन रान उठवा. कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या लबाड सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे आहे.राष्ट्रवादी महिला काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार आसूड ओढला. महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने यांनी प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्नेहा देसाई, सुचित्रा पडवळ, वैशाली पाटील, शर्मिला सावंत, सुलोचना पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्मिता आवळे, शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील, भावना गाडेकर, अमर पाटील आदी उपस्थित होते.

झेंड्याची दोरी पवार यांच्यामुळेचमहिलांना पूर्वी पाळण्याची दोरी असायची; पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मानाची पदे मिळाली. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी तिच्या हाती झेंड्याची दोरी आल्याचे प्रा. म्हेत्रे यांनी सांगितले.

समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार‘इंडिया आघाडी’च्या नेत्यांमध्ये कोणती जागा कोणाला, याबाबत अनेक वेळा चर्चा झालेली आहे. थाेड्याच दिवसांत अंतिम निर्णय होईल. व्ही. बी. पाटील यांचे काम चांगले आहे. आमचा त्यांच्यासाठी प्रयत्न राहणार आहे; पण शेवटी समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार निश्चित केला जाईल, असे खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारRohini Khadseरोहिणी खडसेInflationमहागाई