शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ४.५९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा, लाभापासून वंचित किती.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: June 20, 2024 18:38 IST

अद्याप ६११० शेतकऱ्यांची ‘केवायसी‘ प्रलंबित

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पी. एम. किसान पेन्शन योजनेचा १७ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५९ हजार ३१७ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग होणार असून अद्याप ६ हजार ११० शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्याने त्यांना लाभापासून वंचित रहावे लागले आहे. येत्या आठवडाभरात बँकनिहाय पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या भूमिकेतून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना महिन्याला ५०० रुपये असे चार महिन्याला दोन हजार रुपये पी. एम. किसान पेन्शन योजना सुरू केली. ज्याच्या नावावर सातबारा आहे, त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळतो. पण, सरकारी, निमसरकारी, शासकीय पेन्शनधारक, आयकर परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यात साडेपाच लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरले होते. केंद्र सरकारच्या वतीने संबंधित लाभार्थ्यांची तपासणी केल्यानंतर सरकारी, निमसरकारी आदी लाभार्थी सापडले. त्यांची पेन्शन रद्द करण्यात आली असून शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना आता लाभ मिळत आहे.आतापर्यंत पेन्शनचे १७ हप्ते आले असून केंद्र सरकारने मंगळवारी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ३१७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

कृषी विभागाने केले गतीने काममध्यंतरी वर्ष-दीड वर्षे पी. एम. किसान पेन्शन योजनेचे काम कोणी करायचे? यावरून महसूल व कृषी विभागात वाद सुरू होता. त्यामुळे लाखो पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. राज्य शासनाच्या पातळीवर हा विषय कृषी विभागाकडे सोपवण्यात आला आणि कामाला गती मिळाली.कृषी सहायकांशी संपर्क साधामोठे शेतकरी वगळून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. ज्याच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनी गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली तर त्यांना पेन्शन सुरू होऊ शकते.

तालुकानिहाय पेन्शनधारक लाभार्थी -तालुका  - एकूण पात्र - १७ वा हप्ता जमाआजरा  -  २९,०३९  - २७,५९२भुदरगड  - ३२,२९९  - ३०,५२५चंदगड  -  ३९,६०३  - ३७,८०९गडहिंग्लज - ४७,५१९ - ४५,०९८गगनबावडा - ७,२५६ - ६,९८६हातकणंगले - ४९,३८५ - ४६,७५२कागल - ४८,९४२  - ४७,५५०करवीर  - ६२,९८४ - ५९,७७०पन्हाळा - ४७,४०६  - ४४,२३७राधानगरी - ४०,७५९  - ३८,८७६शाहूवाडी  - ३३,४५४ - ३१,०८१शिरोळ - ४५,०११  - ४३,०४१

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीbankबँकPensionनिवृत्ती वेतन