पेन्शन अदालत सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:23+5:302021-09-09T04:29:23+5:30
कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी संघटन, क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयात सोमवारी (दि. १३) सकाळी ...

पेन्शन अदालत सोमवारी
कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी संघटन, क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयात सोमवारी (दि. १३) सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत ‘पेन्शन अदालत’ आयोजित करण्यात आली आहे.
या पेन्शन अदालतीमध्ये पेन्शनर्स व जे सभासद पुढील तीन महिन्यांत वयाची ५८ वर्षे पूर्ण करून पेन्शनसाठी पात्र आहेत, अशा सभासदांच्या काही तक्रारी, अडचणी किंवा कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत काही शंका आहेत, अशांनी आज, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत स्वत:च्या सहीनिशी ro.kolhapur@epfindia.gov.in या ई-मेलवर अर्ज सादर करावा. यामध्ये पेन्शन अदालत व पीपीओ क्रमांक किंवा प्राॅव्हिडंट फंड क्रमांक यांचा स्पष्ट उल्लेख करावा. ही अदालत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यासंबंधीची लिंक पाठविली जाणार आहे. त्याकरिता इमेल किंवा व्हाॅटस्ॲप क्रमांकही अर्जात नमूद करावा, असे आवाहन सहायक भविष्य निधी आयुक्त अमित चौगुले यांनी केले आहे.