शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबीत प्रश्न तडीस नेणार, तिन्ही मंत्र्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 17:32 IST

थेट पाईपलाईन, सर्कीट बेंच, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह जिल्ह्यातील रखडलेले प्रश्नांच्या सोडवणूकीचा कृती कार्यक्रम तयार करून ते प्राधान्याने तडीस नेऊ, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ऐतिहासिक दसरा चौकात शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे तिन्ही मंत्र्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात ग्वाहीपहिल्या सोमवारी ‘जनता दरबार’ घेणार

कोल्हापूर : थेट पाईपलाईन, सर्कीट बेंच, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह जिल्ह्यातील रखडलेले प्रश्नांच्या सोडवणूकीचा कृती कार्यक्रम तयार करून ते प्राधान्याने तडीस नेऊ, अशी ग्वाही मंत्रीहसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ऐतिहासिक दसरा चौकात शुक्रवारी दिली.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शासकीय विश्रामगृहात ‘जनता दरबार’ आयोजित करणार असून यामध्ये सामान्य माणसाची शासकीय कार्यालयातील प्रलंबीत प्रश्नांचा निपटारा लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हसन मुश्रीफ, सतेज पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर या तिन्ही मंत्र्यांचे शुक्रवारी कोल्हापूरात आगमन झाले. कावळा नाका येथून मिरवणूकीने दसरा चौकात ’झालेल्या सभेत महापालिकेच्या वतीने महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर तर डॉ. डी. वाय. पाटील गु्रपच्या वतीने संजय डी. पाटील यांच्या हस्ते मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

खासदार संजय मंडलीक, आमदार चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी आभार मानले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, दिनकरराव जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, उपमहापौर संजय मोहिते, मानसिंगराव गायकवाड, जिल्हा परिेषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, विजय देवणे, प्रा. जयंत पाटील, प्रतिमा सतेज पाटील, बाजार समितीचे सभापती दशरथ माने, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, अ‍ॅड. सुरेश कुराडे यांच्यासह नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफ