अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:42+5:302021-06-03T04:18:42+5:30

या अपघातात महादेव रामचंद्र वाघमोडे (वय ४०, मूळ गाव चिंचवडेनगर, ता. हवेली, जि. पुणे; सध्या रा. वठार) असे ...

Pedestrian killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

या अपघातात महादेव रामचंद्र वाघमोडे (वय ४०, मूळ गाव चिंचवडेनगर, ता. हवेली, जि. पुणे; सध्या रा. वठार) असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. याबाबत फिर्याद विनायक गणपती मेहरे (रा. वठार तर्फ वडगाव) यांनी दिली.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी :

वडगाव येथील मेहरे यांच्या वर्कशॉपमध्ये वाघमोडे हा १५ दिवसांपासून नोकरीला आले होते. मंगळवारी (दि. १) काम आटोपून सायंकाळी सातला वर्कशॉप बंद करून सर्वजण घरी गेले होते.

दरम्यान, वेलकम हाॅटेलचालकाने मेहरे यांना त्यांचा कामगार जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर मेहरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाघमोडे दोन्ही पायांवरून गाडीचे चाक गेले होते. पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. उपचारांपूर्वीच मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी सीपीआर रुग्णालय येथे करण्यात आली. बुधवारी मृतदेह मूळ गावी नेण्यात आले. वाघमोडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. हवालदार पतंगराव रेणुसे तपास करीत आहेत.

Web Title: Pedestrian killed in collision with unknown vehicle