गारगोटीचा आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST2021-04-07T04:25:39+5:302021-04-07T04:25:39+5:30
शासनाने जाहीर केलेली रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी आदेशानुसार गारगोटी येथे भरणारा बुधवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आला असून ...

गारगोटीचा आठवडी बाजार बंद
शासनाने जाहीर केलेली रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी आदेशानुसार गारगोटी येथे भरणारा बुधवारचा आठवडी बाजार
बंद करण्यात आला असून नेहमीची दुकाने नियमांचे पालन करीत सुरू राहतील अशी माहिती सरपंच संदेश भोपळे यांनी दिली.
दर बुधवारी गारगोटी शहरात आठवडी बाजार भरतो. या
बाजारात लहान-मोठे सुमारे तीन हजार व्यापारी कोल्हापूर
जिल्हा, कोकण व कर्नाटकातून येत असतात. गारगोटी शहरासह भुदरगड तालुक्यातून सुमारे पंचवीस हजार नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात.इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीमध्ये कोरोना प्रतिबंध नियम काटेकोरपणे पाळले जात
नाहीत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरले जात नाहीत. हे लक्षात घेऊन बुधवारचा आठवडी बाजार बंद
करण्यात आला असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर
करण्यात आले.