शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बँकिंग क्षेत्रामधील पेमेंट पद्धती ही अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण कणा : अरुंधती सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:39 IST

शिवाजी विद्यापीठाच्या बँक आॅफ इंडिया अध्यासन आणि रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांच्यातर्फे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी होते.

ठळक मुद्दे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

कोल्हापूर : कागदोपत्री व्यवहार कमी होऊन डिजिटल पेमेंट, कार्ड पेमेंट याबरोबरच मोबाईल बॅँकिंगच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ ही ग्राहकांच्या मागणीबरोबरच काळाची गरज बनलेली आहे. बॅँकिंग क्षेत्रामधील पेमेंट पद्धती हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल सुरक्षा पद्धती चांगल्या प्रकारे कार्यान्वित झालेली आहे. अनेक तरुणांना या क्षेत्रामधील नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, असे प्रतिपादन रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया, विभागीय कार्यालय, मुंबई येथील साहाय्यक महाव्यवस्थापक अरुंधती सिन्हा यांनी गुरुवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बँक आॅफ इंडिया अध्यासन आणि रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांच्यातर्फे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी होते.

अरुंधती सिन्हा पुढे म्हणाल्या, सुरक्षित आर्थिक व्यवहारांमध्ये जलदता आणण्यासाठी संपूर्ण बॅँकिंग उद्योगांसह अन्य पेमेंट सिस्टीम आॅपरेटर्सनाही या प्रणालीबाबत सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. रोख आर्थिक व्यवहार कमी करून डिजिटल व्यवहारांकडे जनसामान्यांचा कल वाढविण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असली तरी त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल व्यवहारांसाठी आरबीआय एक सुरक्षित प्रणाली तयार करीत आहे.

अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले, सायबर गुन्ह्यांकडे गंभीरतेने व सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये बॅँकिंग व्यवहारामध्ये काही चुकीच्या आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. त्यासाठी बँक, वित्त आणि आॅनलाईन डिजिटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

याप्रसंगी आरबीआय मुंबई येथील विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक अंकुर सिंग, आदी उपस्थित होते. बँक आॅफ इंडिया कोल्हापूर, लीड बॅँकेचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. सी. तळुले यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या बॅँक आॅफ इंडिया चेअर इन रुरल बॅँकिंगचे समन्वयक डॉ. व्ही. बी. ककडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, अनिल पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तीन आराखडेनव्या तंत्र प्रगत बॅँकिंग व्यवस्थेचा ई-पेमेंट हा भाग असून त्याबाबत जनजागृती करण्याचे काम रिझर्व्ह बॅँकेने हाती घेतले आहे. यासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार केला असून सुरक्षित, खात्रीशीर, परवडणारी ई-देय प्रणाली करीत असताना खर्चघट, स्पर्धावाढ, सोईस्करता व विश्वसनीयता हे चार महत्त्वाचे घटक आहेत, असेही सिन्हा यांनी सांगितले. 

 

टॅग्स :SBIएसबीआयbankबँक