ब्रिक्सकडून कामगारांना विम्या दाव्याची रक्कम अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:55+5:302021-04-30T04:30:55+5:30
अदा करण्यात आली, अशी माहिती ब्रिक्स कंपनीचे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे, युनायटेड इंडिया ...

ब्रिक्सकडून कामगारांना विम्या दाव्याची रक्कम अदा
अदा करण्यात आली, अशी माहिती ब्रिक्स कंपनीचे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे कारखान्याच्या कामगारांचा अपघात वीमा उतरवला होता. त्यातील दाव्यांपोटी विमा कंपनीकडून प्राप्त विम्याची रक्कम मयत कामगारांच्या वारस व अपघात जखमी कामगारांना देण्यात आली.
दिवंगत राजेंद्र कल्लाप्पा लोहार यांच्या पश्चात पत्नी सुनीता राजेंद्र लोहार यांना ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
इरगोंडा पाटील यांना १८ हजार २६० रुपये, अशोक कुंभार यांना १० हजार १८१ रुपये, दत्तात्रय वाघराळकर यांना ९ हजार ७४२ रुपये, यशवंत गुरव यांना ८ हजार १८९ रुपये इतकी रक्कम देण्यात आली.
यावेळी प्रशासन अधिकारी श्याम हरळीकर, वित्त अधिकारी आनंदा लोहार आदी उपस्थित होते.
------
हरळी (ता.गडहिंग्लज) येथे सुनीता राजेंद्र लोहार यांना वसंत गुजर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी श्याम हरळीकर, वित्त अधिकारी आनंदा लोहार आदी उपस्थित होते.