शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Chandrakant Patil: आमदारांवरील लयलुटीपेक्षा पूरग्रस्तांचे पैसे द्या, चंद्रकांत पाटलांचे उपहासात्मक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:41 IST

आता १४ हजार कोटी रूपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातून काय करणार याची श्वेतपत्रिका काढा.

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारकडून केवळ आमदार टिकवण्यासाठी लयलूट सुरू आहे. आमदार देखील जास्तीचे पदरात पाडून घेत आहेत. त्याचबरोबर किमान पूरग्रस्तांचे तरी पैसे द्या असे उपहासात्मक आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. पूरग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत आज, बुधवारी भाजपच्यावतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘टाहो मोर्चा’ काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, हे डोळे, कान बंद केलेले सरकार आहे. राज्यात कोणत्याही प्रश्नावर टाहो मोर्चा काढावा लागतो. २०१९ ला महापूर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून मदत केली. अगदी घरातील चिखल काढून, दुर्गंधी घालवण्यापर्यंत काम झालं. मी स्वत पाण्यात असताना मदतीचा शासन आदेश काढायला लावला. तळमजलावाल्यांना, मग सर्वच मजल्यावरील नागरिकांना मदत केली. दुकानदारांना मदत केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. जनावरांसाठी मदत केली.राजू शेट्टी यांनीही सांगितले की २०१९ च्या शासन आदेशानुसारच २०२१ च्या पूरग्रस्तांना मदत द्या. परंतू ते महाविकास आघाडी सरकारला जमले नाही. आता १४ हजार कोटी रूपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातून काय करणार याची श्वेतपत्रिका काढा. पूर आल्यानंतर स्वयंसेवी संस्थांनी काम करायचं आणि पालकमंत्री झोपायला रिकामे असं चालणार नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी