आशा वर्कर्सचे थकीत मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:40+5:302021-07-07T04:31:40+5:30
इचलकरंजी : कोरोना संसर्गाच्या काळात सर्व्हे केलेले आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांचे आठ महिन्यांचे मानधन थकीत आहे. ते त्वरित द्यावे, अशी ...

आशा वर्कर्सचे थकीत मानधन द्या
इचलकरंजी : कोरोना संसर्गाच्या काळात सर्व्हे केलेले आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांचे आठ महिन्यांचे मानधन थकीत आहे. ते त्वरित द्यावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे केली आहे. थकीत मानधन त्वरित न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
नगरपालिकेने कोरोना महामारीत आशा वर्कर्सना गतवर्षीपासून सर्व्हेचे काम दिले असून, महिन्याला तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या पाठपुराव्याने गेल्यावर्षी सात महिन्यांचे मानधन मिळाले. मात्र, नोव्हेंबर २०२० पासून मानधन अद्याप मिळालेले नसल्याने कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा स्वामी यांची भेट घेतली. शिष्टमंडळात सदा मलाबादे, जलवंती भंडारे, वृषाली माने, सुषमा जाधव, दीपाली टकले, सविता कुंभार यांचा समावेश होता.