एटीएममधून न मिळालेल्या रकमा तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:28+5:302021-03-26T04:22:28+5:30

शहरातील आयडीबीआय बँकेच्या चर्च रोडवरील एटीएममधून बऱ्याच नागरिकांना रक्कम मिळालेली नाही; परंतु खात्यावरून पैसे वजा झाले आहेत. नागरिकांनी याबाबत ...

Pay the amount not received from the ATM immediately | एटीएममधून न मिळालेल्या रकमा तातडीने द्या

एटीएममधून न मिळालेल्या रकमा तातडीने द्या

शहरातील आयडीबीआय बँकेच्या चर्च रोडवरील एटीएममधून बऱ्याच नागरिकांना रक्कम मिळालेली नाही; परंतु खात्यावरून पैसे वजा झाले आहेत. नागरिकांनी याबाबत बँकेकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना एटीएममधून न मिळालेल्या रकमा तातडीने परत द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, आयडीबीआय बँकेच्या या एटीएममधून पैसे काढतेवेळी केवळ पैसे मिळत असल्याचा आवाज येतो; पंरतु पैसे मशीनमधून बाहेर येत नाहीत आणि पैसे खात्यातून वजा झाल्याचा संदेश येतो.

बँकेकडे नागरिकांनी तक्रारी देऊनही बँकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे योग्य तपास करून पैसे न मिळालेल्यांना न्याय द्यावा. तसेच मशीनमध्ये बिघाड असेल तर त्याची तात्काळ दुरुस्ती करावी.

निवेदनावर, शरद हासबे, प्रशांत कुलकर्णी, श्रीकांत शेलार, संतोष चौगुले, अमोल हातरोटे, चिन्मया देशपांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Pay the amount not received from the ATM immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.