शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; शासनाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:24 IST

co-operative elections : राज्य शासनाने स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंगळवारी अखेर मान्यता दिली आहे. गेले वर्षभर विविध कारणांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. 

काेल्हापूर : राज्य शासनाने स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंगळवारी अखेर मान्यता दिली आहे. गेले वर्षभर विविध कारणांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. डिसेंबर २०२० अखेर मुदतवाढ संपल्यानंतर सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, राज्य शासनाने १६ जानेवारी २०२१ ला पुन्हा मार्च २०२१ पर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या. याबाबत काही संस्थांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे शासनाने स्थगित प्रक्रिया पुन्हा सुरू केली असून, कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 

९५ नगर परिषदा, नगरपंचायतींसाठी १५ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या मुंबई : विविध जिल्ह्यांमधील ९५ नगर परिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, तसेच इतर विविध ३१ नगर परिषदा, नगरपंचायतींमधील ३५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी येथे दिली.नवी मुंबई, वसई-विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, तसेच इतर विविध १६ महानगरपालिकांतील २५ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहितीही मदान यांनी दिली.याशिवाय, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ११ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असेही मदान यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र