पावनगडावर स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: May 15, 2017 00:55 IST2017-05-15T00:55:16+5:302017-05-15T00:55:16+5:30
संभाजी महाराज यांची जयंती : ‘मावळा प्रतिष्ठान’चा उपक्रम

पावनगडावर स्वच्छता मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
पन्हाळा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पावनगड येथील महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर व हनुमान मंदिर या परिसराची मावळा प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणाले, गडावरील प्रत्येक दगडाला इतिहास आहे. येथील वास्तू काळाच्या ओघात नष्ट होऊ पाहत आहे. याचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी असून, गेली दीड वर्षे मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवून इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम सुरू आहे.
सकाळी पन्हाळा येथील छत्रपती संभाजी मंदिरातील संभाजीराजेंच्या समाधीचे पूजन मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, माजी उपसभापती रवींद्र जाधव यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, नगराध्यक्षा रूपाली धडेल, उपनगराध्यक्ष अवधूत भोसले, कोडोलीचे सरपंच नितीन कापरे, वारणा बँकेचे संचालक प्रताप पाटील, पंचायत समितीचे सदस्य व जनसुराज्य शक्ती पक्षाचे पक्षप्रतोद अनिल कंदुरकर, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, बहिरेवाडीचे उपसरपंच शिरीष जाधव उपस्थित होते.