पट्टणकोडोली उपसरपंच मसूरकर यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST2021-03-10T04:24:34+5:302021-03-10T04:24:34+5:30
पट्टणकोडोली ग्रामपंचायत निवडणूक २०१७ मध्ये झाली आहे. उपसरपंचपदी धुळा डावरे, सूर्यकांत भोजे यांची वर्णी लागली होती. प्रत्येकाला संधी मिळावी ...

पट्टणकोडोली उपसरपंच मसूरकर यांचा राजीनामा
पट्टणकोडोली ग्रामपंचायत निवडणूक २०१७ मध्ये झाली आहे. उपसरपंचपदी धुळा डावरे, सूर्यकांत भोजे यांची वर्णी लागली होती. प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी सहा महिन्याचा कालावधी उपसरपंचपदासाठी ठरविण्यात आला आहे. त्यानुसार मसूरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच यांच्याकडे दिला आहे. उपसरपंचपदाच्या काळात कृष्णात मसूरकर यांनी आपल्या नियोजनाच्या जोरावर ग्रामपंचायत कारभारात सुसूत्रता आणून गावच्या विकासासाठी प्रयत्न केला. गावच्या विकासासाठी ७० लाख रूपयांचा निधी आणला आहे. कोअर कमिटीने ठरवून दिलेल्या वेळेत आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे असे कृष्णात मसूरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सरपंच विजया जाधव,ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे, सुनील रास्ते,धुळा डावरे, सूर्यकांत भोजे, सागर तोडकर, धोडींराम माळी, नंदकुमार माळी, बिरू कुशाप्पा, शिवसेना उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, सरदार सूर्यवंशी उपस्थित होते.