सागरिका घाटगे यांना पितृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST2021-01-10T04:18:45+5:302021-01-10T04:18:45+5:30

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील विजयसिंह यशवंतराव घाटगे (वय ६४) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ...

Patriarchal condolences to Sagarika Ghatge | सागरिका घाटगे यांना पितृशोक

सागरिका घाटगे यांना पितृशोक

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील विजयसिंह यशवंतराव घाटगे (वय ६४) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे यांचे ते वडील, भारतीय क्रिकेट संघातील निवृत्त गोलंदाज जहीर खान यांचे सासरे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचे ते चुलत काका होत.

विजयसिंह घाटगे हे गेली ५-६ वर्षे आजारी होते. अखेर शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, मुलगी सागरिका व मुलगा शिवजित असा परिवार आहे. कागल येथील दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांचे ते चुलत बंधू होत. विजयसिंह यांना लहानपणापासूनच सिनेसृष्टीबद्दल आकर्षण होते. त्यामुळे बरीच वर्षे ते मुंबईतच वास्तव्यास होते. शोभायात्रा चित्रपटाचे ते निर्माते होते व बरीच वर्षे सिनेसृष्टीत कार्यरत होते.

--

फोटो नं ०९०१२०२१-कोल-विजयसिंह घाटगे (निधन)

-

Web Title: Patriarchal condolences to Sagarika Ghatge