‘बिनदाती’त पाटील यांची बैलजोडी सदृढ

By Admin | Updated: July 12, 2017 00:45 IST2017-07-12T00:45:45+5:302017-07-12T00:45:45+5:30

‘बिनदाती’त पाटील यांची बैलजोडी सदृढ

Patil's assault in 'Binadati' strengthened | ‘बिनदाती’त पाटील यांची बैलजोडी सदृढ

‘बिनदाती’त पाटील यांची बैलजोडी सदृढ


लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : येथील शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे आयोजित सदृढ बैलजोडी स्पर्धेत बिनदाती गटात प्रणव पाटील (गडहिंग्लज), दाती गटात संजय संकपाळ (मुत्नाळ), तर बैलजोडी गटात अरुण भोसले (गडहिंंग्लज) यांच्या बैलजोडींनी प्रथम क्रमांक पटकाविला. सलग १७ व्या वर्षी भरविण्यात आलेल्या स्पर्धेत यावर्षी ३० बैलजोड्यांनी भाग घेतला.
बँडबाज, लेझीम, झांजपथक, बेंजोंच्या निनादात रिमझिम पावसातही तब्बल ७ तास मिरवणुका काढण्यात आल्या. सर्व बैलजोड्या सवाद्य मिरवणुकीने स्पर्धेच्या ठिकाणी शिवाजी चौकात आणल्या. त्याठिकाणी तज्ज्ञ शेतकरी व पंचांनी बैलजोड्यांचे परीक्षण केले. शहरातील सर्व रस्ते हुर्रमंजात न्हाऊन निघाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी सीमाभागातील हजारो शौकीन व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
नेहरू चौकात नगरपालिकेतर्फे कासरा, गांधी टोपी, श्रीफळ व पानविडा देऊन प्रत्येक बैलजोडी मालकाचे नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी, मुख्याधिकारी संजय केदार व नगरसेवकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
गटनिहाय अनुक्रमे निकाल असा - बिनदाती गट - प्रणव पाटील (गडहिंग्लज), बाळेश नाईक (बसर्गे), निळकंठ पुळमुळे (भडगाव), सत्याप्पा मोकाशी (खणदाळ), श्रीकांत खोत (गडहिंग्लज).
दाती गट - संजय संकपाळ (मुत्नाळ), आनंदा पाटील (हनिमनाळ), नारायण यडूरकर (बसर्गे), वैभव पाटील (गडहिंग्लज), दर्शन पाटील (नूल).
बैलजोडी गट - अरुण भोसले (गडहिंग्लज), मधुकर गुरव (बेकनाळ), बाबूराव कोरी (भडगाव), अशोक खवणे (नूल), भूषण नेवडे (गडहिंग्लज).
प्रत्येक गटातील विजेत्यांना अनुक्रमे २०,०००, १५,०००, १०,०००, ५०००, ३००० अशी रोख बक्षिसे देण्यात आली. गडहिंंग्लज कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे, डीवायएसपी रमेश पाटील, पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर यांनी आभार मानले.

Web Title: Patil's assault in 'Binadati' strengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.