शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Kolhapur: पाटगांव हनी ब्रँड जगभर पोहोचवणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 13:58 IST

कडगाव : मध उत्पादन आणि विक्रीसाठीच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करून "पाटगाव हनी ब्रँड" जगभरात ...

कडगाव : मध उत्पादन आणि विक्रीसाठीच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करून "पाटगाव हनी ब्रँड" जगभरात पोहोचवणार असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिले.मधाचे गाव पाटगाव"चा लोकार्पण सोहळा व मधपाळ मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, नाबार्डचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनिलकुमार रावत, इंडो काऊंट फाउंडेशनचे संदीपकुमार, जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समन्वयक संदेश जोशी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रवर्तक अविनाश पाटील, पाटगावचे सरपंच विलास देसाई उपस्थित होते. यावेळी १०० मधपाळकांना प्रमाणपपत्राचे वितरण तसेच १२०० मधपेट्यांचे वाटप झाले. 'पाटगाव हनी ब्रँड' आणि 'हनी चॉकलेट'चे अनावरण झाले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, पाटगावसह मठगाव, शिवडाव, अंतुर्ली, तांब्याची वाडी या पाचही ग्रामपंचायतींना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी निधीची मागणी केली असून त्यासाठी प्रयत्न केले जातील. पाटगाव ते रांगणा किल्ला मार्गावरील असणाऱ्या पुलाच्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देऊ.खासदार संजय मंडलिक म्हणाले, उपक्रमामुळे या भागातील गावे स्वयंपूर्ण होऊन खऱ्या अर्थाने 'ग्रामविकास' साधला जाईल. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी प्रधानमंत्री यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पाटगावचा समावेश होण्यासाठी व उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, मध उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या योजनेतून २ कोटी २७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मध उद्योग व पर्यटनाला चालना देण्यासाठी पाटगाव येथे भव्य हनी पार्क व सामूहिक सुविधा केंद्र तयार करण्यात येणार आहे. भविष्यात "पाटगाव हनी ब्रँड" आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करू. नाबार्डचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनिलकुमार रावत यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कोणतेही उत्पादन जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत जौंजाळ यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ