शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट, डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:35 IST

या संयुगाची कर्करोगाच्या पेशींवर यशस्वी चाचणीही घेण्यात आली

कोल्हापूर : यकृताच्या कर्करोगावरील उपचारप्रसंगी केवळ कर्करोगाच्याच पेशींना लक्ष्य करणाऱ्या अभिनव संशोधनासाठीशिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांना भारतीय पेटंट मिळाले. डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह संशोधक विद्यार्थी डॉ. रुतीकेश गुरव व अक्षय गुरव यांनी हे संशोधन केले.यकृताच्या कर्करोगावर इतर सर्वसामान्य पेशींना कोणताही अपाय न करता केवळ कर्करोगाच्याच पेशींना लक्ष्य करणाऱ्या ‘डायहैड्रोपिरिमिडोन्स’ या सेंद्रिय संयुगांची निर्मिती करण्यात यश प्राप्त झाले. या संयुगाची कर्करोगाच्या पेशींवर यशस्वी चाचणीही घेण्यात आली. याच्या अहवालात ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात. ते करीत असताना शरीरातील इतर सामान्य पेशींना अपाय करत नाहीत. त्यामुळे ही संयुगे कर्करुग्णावर उपचारांसाठी सुरक्षित असल्याचे आढळून आले. यकृताच्या कर्करोगामुळे होणारा पुरुषांचा जागतिक मृत्यूदर अधिक आहे. आतापर्यंत यकृत कर्करोगाच्या उपचारासाठी सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, अँटीबॉडीज् अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती विकसित करण्यात आल्या. परंतु, या उपचार पद्धतींमध्ये रुग्णाला उपचारादरम्यानच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये काही औषधांचा उपयोग केला जातो, परंतु या औषधांचा इतर सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतो. सध्या वापरात असलेली कर्करोगावरील औषधे ही कर्करोगाच्या पेशी व इतर सामान्य पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. रुतीकेश गुरव आणि अक्षय गुरव यांनी बारा नवीन ‘डायहैड्रोपिरिमिडोन्स’ सेंद्रिय संयुगे प्रयोगशाळेमध्ये तयार केली. त्यांची चाचणी ‘एच.इ.पी.जी.-२’ या यकृताच्या कर्करोगाला कारणीभूत असणाऱ्या पेशींवर केली. ही संयुगे खूपच निवडकरित्या कर्करोग पेशी नष्ट करतात, असे संशोधनांती आढळले. या संयुगांच्या सदर निवडकतेच्या गुणधर्मामुळेच या संशोधनास भारतीय पेटंट प्राप्त झाले.

यकृताच्या कर्करोगावरील उपचारांसाठी अतिशय नावीन्यपूर्ण संशोधनास पेटंट प्राप्त झाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण संशोधनावर पुनश्च एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठcancerकर्करोगResearchसंशोधन