‘पाटबंधारे’चा लिपिक लाच घेताना जाळ्यात

By Admin | Updated: June 14, 2014 01:25 IST2014-06-14T01:24:24+5:302014-06-14T01:25:42+5:30

बदलीचा अर्ज पाठविण्यासाठी घेतली पाच हजार रुपयांची लाच

'Patanjhare' clerk is taking a bribe | ‘पाटबंधारे’चा लिपिक लाच घेताना जाळ्यात

‘पाटबंधारे’चा लिपिक लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : बदलीचा अर्ज पुढे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिक संशयित दिनकर अण्णाप्पा कांबळे (वय ५४, रा. वसगडे, ता. करवीर) याला आज- शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ताराबाई पार्क येथील सिंचन भवन पाटबंधारे विभागाच्या परिसरात पोलिसांनी केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बावडा येथे पाटबंधारे शाखेमध्ये कालवा निरीक्षक म्हणून संदीप मंचकराव अंभुरे (वय २४, रा. मूळ गाव परभणी) हे २० नोव्हेंबर २०११ पासून या ठिकाणी काम करतात. ते अपंग असून अपंग वर्गवारीमधून भरती झाले आहेत. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी परभणी जिल्ह्णात बदली होण्यासाठी कोयना बांधकाम मंडळ व परिमंडळीय अधिकारी अधीक्षक अभियंता यांच्याकडे अर्ज करून त्याची पोहोच घेतली. त्यानंतर हा अर्ज पंचगंगा पाटबंधारे उपविभाग सहायक अभियंता (श्रेणी वर्ग) यांच्यामार्फत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठविल्याचे अंभुरे यांना समजले. त्यांनी या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिनकर कांबळे यांची भेट घेतली. त्यावेळी कांबळे याने ‘तुझी फाईल माझ्याकडे आहे. तुझी बदली व्हावी, अशी शिफारस मी करीन.
/ पान ४ वरत्याकरिता पाच हजार रुपये दिले पाहिजेस.’ असे सांगितले. तेव्हा त्यांनी ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे सांगितले. त्यावेळी ‘तू मला पैसे देत नाहीस तोपर्यंत तुझा अर्ज पुढे पाठवणार नाही,’ असे त्याने अंभुरे यांना सांगितले. त्यानंतर अनेक वेळा कांबळे यांना भेटून बदलीचा अर्ज पुढे पाठवा, अशी त्यांनी विनंती केली. परंतु, त्यांनी पैसे देत नाही तोपर्यंत अर्ज पुढे पाठवणार नाही, असे अंभुरे यांना सांगितले.
त्यानंतर काल, गुरुवारी अंभुरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी पाटबंधारे विभाग येथे पाच हजारांची लाच स्वीकारताना संशयित दिनकर कांबळे याला पोलिसांनी सापळा रचून पकडले. दरम्यान, लाच घेतल्यानंतर पोलिसांचे पथक कांबळे याच्या वसगडेतील घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उदयसिंह पाटील, पोलीस हवालदार श्रीधर सावंत, जितेंद्र शिंदे, दयानंद कडूकर, पावलेकर ,महिला पोलीस शिपाई अर्पिता चौधरी यांनी केली.
साडेपाच महिन्यात ११ जण जाळ्यात...
१ जानेवारी ते आज (शुक्रवार )अखेर लाचलुचपत विभागाने जिल्ह्यात ११ जणांना लाचप्रकरणी अटक केली आहे. त्यांमध्ये सर्वाधिक महसूल विभागातील पाच , पोलीस दल दोन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोल्हापूर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद (पीडब्ल्यूडी विभाग) यांतील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले.दरम्यान, लाचेच्या अथवा अपसंपदेच्या तक्रारी असल्यास त्यांनी लाचलुचपत विभाग कोल्हापूर ०२३१ -२५४०९८९ व ९४०४३४५५३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.

Web Title: 'Patanjhare' clerk is taking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.