उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST2021-09-16T04:31:50+5:302021-09-16T04:31:50+5:30
कोल्हापूर : अभियांत्रिकी क्षेत्रात आयुष्यभर नावीन्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप बुधवारी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे मारण्यात ...

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
कोल्हापूर : अभियांत्रिकी क्षेत्रात आयुष्यभर नावीन्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप बुधवारी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे मारण्यात आली. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अर्थात अभियंता दिनानिमित्त अभियंता अरुण भंडारे, दिलीप पाटील, महेश कुलकर्णी, प्रवीण उके, डाॅ. मंजुनाथ बुर्जी, रवींद्र कागलकर यांचा शिवाजी विद्यापीठ, तंत्रज्ञान विभागाचे माजी संचालक डाॅ. जयदीप बागी व प्राचार्य डाॅ. पी. व्ही. कोडोले यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डाॅ. बागी म्हणाले, कोरोना संसर्गासारख्या भविष्यात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी अभियंत्यांनी किमान कौशल्याचा वापर करावा. जेणेकरून अशा विषाणूचा भविष्यात संसर्ग टाळता येऊ शकेल.
डाॅ. कोडोले म्हणाले, कोरोनाच्या काळात डीकेटीईच्या माध्यमातून अनेक उद्योजक तयार झाले. त्यांनी पीपीई किटसह मास्कचे उत्पादन करून निर्यात केली. त्यामुळे गरज ही शोधाची जननी असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले. यानिमित्त कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रियांका पाटील, हर्षल सुर्वे, सुनीता जाधव यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्वागत सचिव प्रदीप कुलकर्णी व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन डाॅ. महेश चौगुले यांनी केले.
फोटो : १५०९२०२१-कोल-इंजिनिअर्स डे
आेळी - इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, कोल्हापूर शाखेच्या वतीने बुधवारी अभियंतादिनानिमित्त आयुष्यभर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट अभियंत्यांसह कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डाॅ. जयदीप बागी, डाॅ. पी. व्ही. कडोले, डाॅ. महेश चौगुले, प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)