गेली दोन वर्षे नगरपरिषदा, नगरपंचायतींचे प्रस्ताव प्रलंबितच
By Admin | Updated: March 9, 2015 01:13 IST2015-03-09T01:12:54+5:302015-03-09T01:13:08+5:30
शासनाचा कारभार : तालुकास्तरावरील नगरपंचायतींसाठी हरकती

गेली दोन वर्षे नगरपरिषदा, नगरपंचायतींचे प्रस्ताव प्रलंबितच
प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर
हातकणंगले तालुक्यातील हुपरी ग्रामपंचायतीची नगरपरिषदेसंदर्भात सुरू असलेली प्रक्रिया वगळता जिल्ह्यातील दोन वर्षांपूर्वी नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी पाठविलेल्या प्रस्तावावर शासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. नुकत्याच तालुकास्तरावरील सात ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्यासंदर्भातील शासनाने मागविलेल्या हरकती याला अपवाद आहेत.
नगरविकास खात्याकडून २५ हजार लोकसंख्येच्या पुढील गावांचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये, तर १० हजारांच्या पुढील गावांचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यासाठी जिल्ह्यातील गावांचे प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या विभागाने अशा गावांची यादी व आवश्यक माहिती डिसेंबर २०१२ मध्ये सहायक संचालक, नगररचना विभागाला पाठविली होती. त्यावर नगररचना विभागाने आपला अभिप्राय नोंदवून फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल पाठविला होता. त्यानुसार या अहवालाबाबत शहानिशा करून, आपले मत नोंदवून १९ मे २०१३ रोजी नगरपालिका विभागाने शासनाला सहा नगरपरिषदा व १५ नगरपंचायती व्हायला हरकत नाहीत, असा अहवाल पाठविला होता. यामध्ये कोडोली, शिरोळ, कबनूर, हुपरी, शिरोली (पुलाची) व हातकणंगले यांची नावे नगरपरिषद होण्यासाठी, तर करवीर तालुक्यातील वडणगे, मुडशिंगी, हातकणंगले तालुक्यातील पारगाव, भादोले, आळते, हेर्ले, पट्टणकोडोली, रुकडी, कुंभोज; भुदरगड तालुक्यातील गारगोटी, आजरा तालुक्यातील आजरा; शिरोळ तालुक्यातील नांदणी, उदगाव, दानोळी, अब्दुललाट यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यातील सर्व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्यासाठी नुकतीच ्घोषणा जारी केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील गारगोटी, चंदगड, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी-तनवाड, आजरा, राधानगरी यांचा यामध्ये समावेश आहे. याबाबत
६ मार्चपर्यंत हरकती घेण्यात आल्या.
प्रलंबित नगरपरिषदा
४शिरोली पुलाची, हुपरी, हातकणंगले, तारदाळ व कोरोची यांची संयुक्तनगर परिषद, कोडोली, शिरोळ
प्रलंबित नगरपंचायती
४वडणगे, मुडशिंगी , पारगाव, भादोले, आळते, हेर्ले, पट्टणकोडोली, रुकडी, कुंभोज, गारगोटी , आजरा, नांदणी, उदगाव, दानोळी, अब्दुललाट