पासार्डेचा पाझर तलाव भरला
By Admin | Updated: July 9, 2016 01:00 IST2016-07-09T00:34:20+5:302016-07-09T01:00:25+5:30
३२ वर्षांची प्रतीक्षा : पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार; शेतीसाठी लाभदायक

पासार्डेचा पाझर तलाव भरला
मच्छिंद्र मगदूम-- सांगरूळ१९८४ साली तयार केलेला पासार्डेचा पाझर तलाव पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला. निकृष्ठ कामामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात वाहून गेले. यानंतर ३२ वर्षे हा तलाव कोरडाच आहे. ३२ वर्षांनंतर प्रशासनाने यंदा तलावाची दुरुस्ती केली. यानंतर तलाव प्
ारिसरात दमदार पाऊस झाल्याने पाझर तलाव तुडुंब भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. पाझर तलाव भरल्याने या परिसरातील आठलेल्या विहिरींना पुन्हा पाझर फुटणार आहे. यामुळे पुढील उन्हाळ्यात येथील शेतकरी पाण्यामुळे सुखावणार आहे.
१९७२ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी शासनाकडून पाझर तलावची मंजुरी घेतली. मात्र, काही अडचणीमुळे प्रत्यक्षात
१२ वर्षांनी १९८४ ला तलावाच्या कामाला सुरुवात झाली. एका वर्षात कामही पूर्ण झाले; पण ठेकेदाराने तलावाला दगडी पिचिंग केले नाही. निकृष्ठ कामामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याआधीच फूटून वाहून गेला. यामध्ये शेतकऱ्यांची ५00 एकर जमीन सिंचनाखाली येणार होती. तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे व प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे.
२0१३ साली १ कोटी ९१ लाखांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठवला; पण हे काम मंत्रालयात रखडले. याच दरम्यान आमशीच्या विमल पुंडलिक पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. त्यांनी पाठपुरावा करून तलाव दुरुस्तीसाठी डी. पी. डी. सी. मधून
२ कोटी २0 लाखांचे बजेट मंजूर करून घेतले व लगेच कामाला सुरुवात झाली. काम पूर्ण होऊन या पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून ओसंडून वाहू लागला आहे
पासार्डे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांच्या आठलेल्या विहिरींना पुन्हा पाझर फुटणार आहे, तसेच पासार्डे गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.
-विमल पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद