‘मदत’च्या ऑनलाईन कोर्समध्ये १ हजार एनसीसी कॅडेटसचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:16+5:302020-12-05T04:54:16+5:30
कोल्हापूर : एनसीसी कॅडेट्ससाठी विनामूल्य आयोजित केलेल्या ऑनलाईन कोर्स ''मदत''मध्ये राज्यातील सुमारे १ हजार एनसीसी कॅडेट सामील झाल्याची ...

‘मदत’च्या ऑनलाईन कोर्समध्ये १ हजार एनसीसी कॅडेटसचा सहभाग
कोल्हापूर : एनसीसी कॅडेट्ससाठी विनामूल्य आयोजित केलेल्या ऑनलाईन कोर्स ''मदत''मध्ये राज्यातील सुमारे १ हजार एनसीसी कॅडेट सामील झाल्याची माहिती कोल्हापूर मुख्यालय येथील एनसीसी कर्नल आणि मुख्य प्रशासन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट (हैदराबाद) यांच्याशी सल्लामसलत करून कोल्हापूर एनसीसी ग्रुप मुख्यालय महाराष्ट्र एनसीसी संचालनालय (मुंबई)च्या वतीने या कोर्सचे संयोजन केले आहे. या ऑनलाईन मुख्य उद्दिष्टे म्हणजे प्रायोगिक योग, विश्रांती चिंतन तंत्र, विचारांची शक्ती, संप्रेषण कौशल्ये, नेतृत्वकौशल्ये, निर्णय घेण्याची कौशल्ये आणि वेळ व्यवस्थापन अशी होती. या कोर्सचा पहिला विभाग आज, शुक्रवारी समाप्त होणार आहे. अभ्यासक्रम तणावमुक्ती, वर्णनिर्मिती आणि सकारात्मक विचारसरणीसाठी खूप उपयुक्त होता, असे मत या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सनी व्यक्त केले आहे.