पोलिसांच्या विधायक कार्यात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:21 IST2021-02-07T04:21:32+5:302021-02-07T04:21:32+5:30

कळंबा : कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असली, तरी प्रशासनातर्फे आयोजित विधायक समाजकार्यात नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, ...

Participate in the constructive work of the police | पोलिसांच्या विधायक कार्यात सहभागी व्हा

पोलिसांच्या विधायक कार्यात सहभागी व्हा

कळंबा : कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असली, तरी प्रशासनातर्फे आयोजित विधायक समाजकार्यात नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले. प्रभाग ८१, जीवबानाना पार्क येथे नगरसेविका मनीषा अविनाश कुंभार यांच्या स्वखर्चाने उभारण्यात आलेल्या पंधरा सीसीटीव्हीचे लोकार्पण कोळेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रमेश चावरे होते. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वाढत्या गुन्हेगारीस चाप बसावा यासाठी समाजविधायक उपक्रम राबविल्याचे नगरसेविका मनीषा कुंभार यांनी सांगितले.

फोटो : ०६ कळंबा सीसीटीव्ही

प्रभाग ८१, जीवबानाना पार्क येथे नगरसेविका मनीषा कुंभार यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही लोकार्पण सोहळ्याला पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, मनीषा कुंभार उपस्थित होते.

Web Title: Participate in the constructive work of the police