टोलविरोधी महामोर्चात वाहतूक संघटनाही होणार सहभागी

By Admin | Updated: June 8, 2014 01:06 IST2014-06-08T01:05:08+5:302014-06-08T01:06:37+5:30

कोल्हापुरातील सर्व अवजड वाहतूक संघटनांचा निर्णय

The participants will also participate in the anti-toll booths | टोलविरोधी महामोर्चात वाहतूक संघटनाही होणार सहभागी

टोलविरोधी महामोर्चात वाहतूक संघटनाही होणार सहभागी

कोल्हापूर : सोमवारी होणाऱ्या टोलविरोधी महामोर्चात सहभागी होण्याचा निर्णय कोल्हापुरातील सर्व अवजड वाहतूक संघटनांनी घेतला आहे. याबाबत नुकतीच एक बैठक कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित केली होती.
कोल्हापुरातील सर्व मालट्रक वाहतूक ट्रान्स्पोर्टस व मालट्रकवर अवलंबून असणारे (लोहार, सुतार, मेकॅनिक, पेंटर, स्पेअर पार्ट विक्रेते, ड्रायव्हर, क्लीनर, ट्रान्स्पोर्टर्स), आदी घटकांना असोसिएशनतर्फे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या घटकांनी मोर्चात सहभागी होणार असल्याचे लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, आदी उपस्थित होते.

Web Title: The participants will also participate in the anti-toll booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.