शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांचे २६ डिसेंबरपासून महाअधिवेशन, कोल्हापूरमधील सहा हजार शिक्षक होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 15:21 IST

राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १६ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन व शिक्षण परिषद दि. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान ओरोस (सिंधुदूर्ग) येथे होणार आहे. यात शिक्षकाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा, भूमिका ठरणार आहे. या महाअधिवेशनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शिक्षक सहभागी होतील, अशी माहिती शिक्षक नेते प्रभाकर आरडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देओरोस येथे शिक्षकाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा, भूमिका ठरणार कोल्हापूरमधील सहा हजार शिक्षक होणार सहभागीमहाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत करण्याबाबत विचार विनिमय

कोल्हापूर : राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १६ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन व शिक्षण परिषद दि. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान ओरोस (सिंधुदूर्ग) येथे होणार आहे. यात शिक्षकाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा, भूमिका ठरणार आहे. या महाअधिवेशनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शिक्षक सहभागी होतील, अशी माहिती शिक्षक नेते प्रभाकर आरडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.आरडे म्हणाले, बदल्यांबाबतच्या शासनाच्या कार्यवाही, भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिक्षणाबाबत शासन सर्तक नसल्याचे त्याचा त्रास शिक्षकांना होत आहे. हे थांबविण्यासाठी आणि विविध प्रलंबित प्रश्न, मागण्यांच्या पूर्ततकडे सरकार, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची दिशा, समितीची भूमिका निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन होणार आहे.

यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी चाललेले उपक्रम व नवीन उपाययोजना यावर परिसंवाद, शिक्षण परिषद होणार आहे. महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत करण्याबाबत विचार विनिमय होणार आहे.यासाठी शिक्षणतज्ज्ञांना निमंत्रित केले. या पत्रकार परिषदेस समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, सरचिटणीस प्रमोद तौंदकर, शहराध्यक्ष उमेश देसाई, राजेंद्र पाटील, कृष्णा कारंडे, आदी उपस्थित होते. 

मागण्या अशा

  1. दि. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
  2.  मोफत गणवेश योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू करा.
  3. एमएससीआयटीला मुदतवाढ करा.
  4. दि. २३ आॅक्टोबरचा वरिष्ठ व निवडश्रेणी संबंधीचा अन्यायकारक शासन आदेश रद्द करा.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक