शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

हल्ले रोखण्यासाठी जर्मनीत अंशत: बुरखाबंदीस मंजुरी

By admin | Updated: April 30, 2017 00:57 IST

जर्मन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने (बुंडेस्ताग) कट्टरवादी हल्ले रोखण्यासाठी अंशत: बुरखाबंदीस, तसेच सुरक्षेच्या इतर काही उपायांनाही मंजुरी दिली आहे.

कोल्हापूर : महानगरपालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी शनिवारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन पुईखडी ते परितेदरम्यान टाकलेल्या जलवाहिनीची तसेच ठिकपुर्ली येथील बांधण्यात आलेल्या लोखंडी उड्डाणपुलाची पाहणी केली. दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीतर्फे उद्या, सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाची व या प्रकल्पात असणाऱ्या इतर त्रुटी व भ्रष्टाचाराची सी.आय.डी. चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक सत्यजित कदम व विजय सूर्यवंशी यांनी दिली. या योजनेत घोटाळा झाल्याची शक्यता असल्याने त्याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन उद्या, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असून, त्यामध्ये आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची बैठक शनिवारी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीस विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, आशिष ढवळे, शेखर कुसाळे, संतोष गायकवाड, नगरसेविका रूपाराणी निकम, मनीषा कुंभार, उमा इंगळे, अश्विनी बारामते यांच्यासह आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी थेट पाईपलाईन योजनेत कशा प्रकारे घोटाळा झाला आहे याची माहिती महाडिक यांना देण्यात आली. महाडिक यांनी सर्व नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ घेऊन सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासन यावेळी दिले. भेटण्याचे ठिकाण व वेळ आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलून घेतो, असेही त्यांनी सांगितले. बैठक संपल्यानंतर सर्व नगरसेवकांनी योजनेच्या कामाची पाहणी केली. (हॅलो ४ वर)वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्या : चंद्रकांतदादाकोल्हापूर : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसंदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या उलटसुलट चर्चा आणि आरोपांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी दखल घेतली आणि त्यांनी या योजनेबाबतचा वस्तुस्थितिदर्शक अहवाल लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्याची सूचना महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना केली. थेट पाईपलाईन योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्यापासून ते ठिकपुर्ली येथील उड्डाणपूल बांधण्यापर्यंत अनेक प्रकारच्या त्रुटी व घोटाळे निर्माण झाले असून, त्याची चौकशी करण्याची मागणी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी केली होती. हीच मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनीही केली आहे. वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांमुळे कोल्हापूरच्या जनतेच्या मनात या योजनेबाबत अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत. योजनेच्या कामाकडे लोक वेगळ्या नजरेने बघत आहेत. त्यामुळे नेमके काय घडले आहे, याचा शोध घेऊन वस्तुस्थितिदर्शक अहवाल आयुक्तांनी तयार करावा आणि तो मुख्यमंत्र्यांना पाठवावा, अशी सूचना आपण केली असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.