उद्यान गाळेप्रश्नी खोकीधारकांचा मोर्चा

By Admin | Updated: June 8, 2016 00:08 IST2016-06-08T00:01:57+5:302016-06-08T00:08:12+5:30

जयसिंगपुरातील आंदोलन : भाजप शहराध्यक्ष धारेवर

Park meeting | उद्यान गाळेप्रश्नी खोकीधारकांचा मोर्चा

उद्यान गाळेप्रश्नी खोकीधारकांचा मोर्चा

जयसिंगपूर : शहरातील जयसिंग महाराज उद्यानाशेजारी असणाऱ्या दुकानगाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याच्या निषेधार्थ शहरातील खोकीधारक व हातगाडी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद भिडे यांच्या घरावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली़ भाजपचा जाहीर निषेध असो, गोरगरिबांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा जाहीर निषेध, अशा आशयांचे फलक आंदोलकांनी धरले होते़ घरासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलक आल्याने तणाव निर्माण झाला़
शहरातील जयसिंग उद्यानालगत लोकांकडून पैसे घेऊन काही नगरसेवकांनी गाळे बांधून दिले. यासाठी रीतसर ठरावही करण्यात आल्याचा आरोप भाजपचे सरचिटणीस राजेंद्र दार्इंगडे यांनी करीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती़ या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी जयसिंगपूर येथील सर्वच हातगाडी व खोकीधारकांनी आपले व्यवसाय बंद ठेवीत भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद भिडे यांच्या घरासमोर निदर्शने केली़ सकाळी दहा वाजता जयसिंग उद्यानापासून मोर्चास सुरुवात झाली़ भिडे यांच्या घरासमोर आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या़ आंदोलक त्यांच्या घराच्या दिशेने गेले़ ते सुनावणीकरिता मुंबईला गेले असल्याने व तेथे भाजपचा एकही पदाधिकारी हजर नसल्याने आंदोलकांनी दार्इंगडे यांच्या घरासमोर ठिय्या मारला़ ही खोकी नियमित करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, असे आश्वासन मिलिंद भिडे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे सुनील ताडे यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)

Web Title: Park meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.