शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

Paris Olympics 2024: महाराष्ट्राचा 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांचा फोन; अभिनंदन केलं, मोठं आश्वासन दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:53 IST

कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला. या ...

कोल्हापूर: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला. या आधी महाराष्ट्राला वैयक्तिक पदक १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांच्या रुपाने मिळाले होते. यानंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने पुन्हा एकदा वैयक्तिक पदक मिळवत देशासह कोल्हापूरचे नाव झळकावले. स्वप्नीलच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे वडील सुरेश कुसाळे यांचे फोनवरुन अभिनंदन करत मोठं आश्वासन दिले. आमदार प्रकाश आबीटकर यांनी मुख्यमंत्र्यांना सुरेश कुसाळे यांच्याशी संपर्क करुन दिला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वप्नीलने मिळवलेले यश हे आपल्या राज्यासाठी अभिमानास्पद आहे. सरकार तुमच्या सोबत असल्याचे सांगत शासन स्वप्निलसाठी जे काही करायचे आहे ते करेल अस आश्वासन दिले. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांना तुम्ही त्याला जे काही पाठबळ दिले, सहकार्य केले त्याबद्दल वडील सुरेश कुसाळे यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी सुरेश कुसाळे यांनी स्वप्नीलच्या खडतर प्रवाशाबद्दलही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. तसेच स्वप्नीलसह आपली भेट घेवू असे सांगत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

स्वप्नीलने फायनलमध्ये धडक मारताच पदक मिळवून अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज स्वप्नीलने कोल्हापुरकरांचे स्वप्न पूर्ण करत इतिहास रचला. त्याच्या यशानंतर जिल्ह्यात जल्लोषाला उधाण आले आहे. 

ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे तिसरे पदक ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी रविवारी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. यानंतर मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदक मिळवले.

टॅग्स :swapnil kusaleस्वप्नील कुसाळेparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Shootingगोळीबारkolhapurकोल्हापूर